कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत करूळ तालुका कणकवली व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट अँड क्लीनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिर व व्यावसायिक प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले असून गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत य् कार्यक्रमाचे उद्या २९ डिसेंबरला सकाळी १०:३० वाजता उद्घाटन होणार आहे.कौशल्य विकास मधून सर्व महिलांना- निळ,फिनोल,वॉश लिक्विड,वॉशिंग पावडर बनवणे व विविध मसाले तयार करणे या व्यावसायिक प्रशिक्षणाचे देण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिरात महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी व इतर (CBC), प्रोटीन अल्बुमिन किंव्हा कॅल्शियम तपासले जातील.या शिबिराला गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करूळ गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी केला आहे.