26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मुणगे सरपंचपदी सौ. अंजली सावंत यांची बिनविरोध निवड.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे गांवच्या सरपंचपदी भाजपच्या सौ. अंजली अशोक सावंत यांची काल शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध निवडून दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या सहकार्यातून गावातील विकासकामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच सौ अंजली अशोक सावंत यांनी यावेळी केले.सरपंच पदासाठी अडीच- अडीच वर्षाचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या सौ साक्षी गुरव यांनी अडीच वर्षे पुर्ण झाल्यामुळे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदाचा प्रभारी कार्यभार उपसरपंच संजय घाडी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

यावेळी प्रभारी सरपंच संजय घाडी, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी आडकर, रविना मालाडकर, संजय घाडी, परिता नाटेकर , तसेच मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, ग्रामसेवक श्री कुबल, भाजप जिल्हा कार्य. सदस्य संजय बांबुळकर, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर, अशोक सावंत, सुनील सावंत, अशोक सावंत, सुरबा सावंत,पोलीस पाटील सौ. साक्षी गोविंद सावंत, सुविधा बोरकर आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे गांवच्या सरपंचपदी भाजपच्या सौ. अंजली अशोक सावंत यांची काल शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध निवडून दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या सहकार्यातून गावातील विकासकामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच सौ अंजली अशोक सावंत यांनी यावेळी केले.सरपंच पदासाठी अडीच- अडीच वर्षाचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या सौ साक्षी गुरव यांनी अडीच वर्षे पुर्ण झाल्यामुळे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदाचा प्रभारी कार्यभार उपसरपंच संजय घाडी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

यावेळी प्रभारी सरपंच संजय घाडी, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी आडकर, रविना मालाडकर, संजय घाडी, परिता नाटेकर , तसेच मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, ग्रामसेवक श्री कुबल, भाजप जिल्हा कार्य. सदस्य संजय बांबुळकर, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर, अशोक सावंत, सुनील सावंत, अशोक सावंत, सुरबा सावंत,पोलीस पाटील सौ. साक्षी गोविंद सावंत, सुविधा बोरकर आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!