29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मिठबाव येथे कै. डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या ७५ वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मिठबाव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मिठबाव येथे ‘क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था’ यांचे संस्थापक कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची ७५ व्या पुण्यतिथी निमित्त डॉ. सत्येंद्र राजे (राष्ट्रीय प्राध्यापक पुरस्कार विजेते) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक दशरथ शिंगारे (महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते) व संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रशासन मधुकर लोके, माजी सहाय्यक कार्यकारी अधिकारी बी. एस. डगरे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी वित्त विभाग प्राचार्य बी. के. चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव आबा लोके, कार्यकारी मंडळाच्या सदस्या मंगेशी मसुरकर, उपसरपंच निवेदिता फाटक, माजी मुख्याध्यापक एच. आर. मोहिते, हिंदळे सरपंच मकरंद शिंद,कोटकामते सरपंच ऋतुजा खाजणवाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पारकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षया लोके, माजी पर्यवेक्षक राजेंद्र हिंदळेकर, एस. पी. लोके, माजी स्कूल कमिटी सदस्य अभि फाटक, दाजी फाटक, अनंत फाटक, सूर्यकांत घारकर, मोहन लोके, नागेश फाटक, दीपक वळंजू, अंतुले जेठे, छाया लोके, गोखले काका पालक वर्ग, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

या वेळी डॉ. शिरोडकर साहेबांना वेळचं वंदन ,भित्तिपत्रक प्रकाशन, हस्तलिखित प्रकाशन,विद्यार्थ्यांचा गुणगौरव, पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सदस्य व मान्यवरांना संस्थेमार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री शिंगारे यांनी डॉक्टर शिरोडकरांचा आदर्श जोपासावा, आपला विद्यार्थी गुरुवर्यांमुळे घडतो तसे गुरुवर्यांच्या सानिध्यातून आपण जास्तीत जास्त आदर्श घेऊन सुसंस्कारी व्हा असे विचार व्यक्त करून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करा असे आवाहन केले. अध्यक्ष स्थानावरून कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तेंद्र राजे म्हणाले की सुंदर कोकणात अनेक महापुरुषाने जन्म घेतला त्यापैकी एक डॉ. शिरोडकर , यांच्या कार्यक्रमाला हजर राहू शकलो हे माझे भाग्य आहे त्यांचे संस्कार त्यांची प्रेरणा त्यांचा मूल्यांच्या विकासाचा हा पुण्यस्मरणचा दिवस आहे. या संस्थेतून अनेक कलावंत निर्माण सामाजिक राजकीय धुरंदर निर्माण होत आहेत ही अभिमानाची बाब आहे. जीवनात यशस्वी व्ह्यायचे तर पैशा पेक्षा ज्ञानाच्या मागे धावा. दुसऱ्यांच्या वेदना जाणणारे आदर्श नागरिक घडवा हीच डॉक्टर शिरोडकरांना श्रद्धांजली ठरेल असे विचार राजे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य भालचंद्र चव्हाण, सूत्रसंचालन सचिन पवार तर आभार मुख्याध्यापक आर. आर. राऊत यांनी मानले. श्री रामेश्वर हायस्कूल शताब्दी महोत्सव व अद्यापक विद्यालय चा अमृत महोत्सव च्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमात उपस्थित असनऱ्यांनी व इतर माजी विद्यार्थी आणि हितचिंतकानी पुढील वर्षातील महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे ग्रामीण भागातील सहाय्यक कार्यकारी अधिकारी एम के लोके यांनी आवाहन केले दरम्यान या महोत्सवी वर्षातील औचित्य साधून दशरथ शिंगारे यांनी ५००१ रुपये देणगी देऊन शुभारंभ केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मिठबाव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मिठबाव येथे 'क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था' यांचे संस्थापक कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची ७५ व्या पुण्यतिथी निमित्त डॉ. सत्येंद्र राजे (राष्ट्रीय प्राध्यापक पुरस्कार विजेते) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक दशरथ शिंगारे (महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते) व संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रशासन मधुकर लोके, माजी सहाय्यक कार्यकारी अधिकारी बी. एस. डगरे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी वित्त विभाग प्राचार्य बी. के. चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव आबा लोके, कार्यकारी मंडळाच्या सदस्या मंगेशी मसुरकर, उपसरपंच निवेदिता फाटक, माजी मुख्याध्यापक एच. आर. मोहिते, हिंदळे सरपंच मकरंद शिंद,कोटकामते सरपंच ऋतुजा खाजणवाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पारकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षया लोके, माजी पर्यवेक्षक राजेंद्र हिंदळेकर, एस. पी. लोके, माजी स्कूल कमिटी सदस्य अभि फाटक, दाजी फाटक, अनंत फाटक, सूर्यकांत घारकर, मोहन लोके, नागेश फाटक, दीपक वळंजू, अंतुले जेठे, छाया लोके, गोखले काका पालक वर्ग, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

या वेळी डॉ. शिरोडकर साहेबांना वेळचं वंदन ,भित्तिपत्रक प्रकाशन, हस्तलिखित प्रकाशन,विद्यार्थ्यांचा गुणगौरव, पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सदस्य व मान्यवरांना संस्थेमार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री शिंगारे यांनी डॉक्टर शिरोडकरांचा आदर्श जोपासावा, आपला विद्यार्थी गुरुवर्यांमुळे घडतो तसे गुरुवर्यांच्या सानिध्यातून आपण जास्तीत जास्त आदर्श घेऊन सुसंस्कारी व्हा असे विचार व्यक्त करून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करा असे आवाहन केले. अध्यक्ष स्थानावरून कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तेंद्र राजे म्हणाले की सुंदर कोकणात अनेक महापुरुषाने जन्म घेतला त्यापैकी एक डॉ. शिरोडकर , यांच्या कार्यक्रमाला हजर राहू शकलो हे माझे भाग्य आहे त्यांचे संस्कार त्यांची प्रेरणा त्यांचा मूल्यांच्या विकासाचा हा पुण्यस्मरणचा दिवस आहे. या संस्थेतून अनेक कलावंत निर्माण सामाजिक राजकीय धुरंदर निर्माण होत आहेत ही अभिमानाची बाब आहे. जीवनात यशस्वी व्ह्यायचे तर पैशा पेक्षा ज्ञानाच्या मागे धावा. दुसऱ्यांच्या वेदना जाणणारे आदर्श नागरिक घडवा हीच डॉक्टर शिरोडकरांना श्रद्धांजली ठरेल असे विचार राजे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य भालचंद्र चव्हाण, सूत्रसंचालन सचिन पवार तर आभार मुख्याध्यापक आर. आर. राऊत यांनी मानले. श्री रामेश्वर हायस्कूल शताब्दी महोत्सव व अद्यापक विद्यालय चा अमृत महोत्सव च्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमात उपस्थित असनऱ्यांनी व इतर माजी विद्यार्थी आणि हितचिंतकानी पुढील वर्षातील महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे ग्रामीण भागातील सहाय्यक कार्यकारी अधिकारी एम के लोके यांनी आवाहन केले दरम्यान या महोत्सवी वर्षातील औचित्य साधून दशरथ शिंगारे यांनी ५००१ रुपये देणगी देऊन शुभारंभ केला.

error: Content is protected !!