ग्रामीण रुग्णालयात होणार्या सामान्य नागरिकांच्या गैरसोयींबाबत व्यक्त केली प्रचंड संतप्त नाराजी.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी सामान्य नागरिकांच्या मालवण ग्रामीण रुग्णालयात होणार्या गैरसोयींबाबत प्रचंड संतप्त नाराजी व्यक्त करून प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे एका लेखी निवेदनाद्वारे त्यांनी तसे जिल्हा वैद्यकीय अधिक्षक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व मालवण पोलिस निरीक्षक यांना सूचीत केले आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालय अनेक आरोग्य सोयी सुविधांची कमतरता आहे. सतत आग्रही पाठपुरावा करून देखिल रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याची स्थिती जैसे थे आहे. गोरगरीब जनतेला सेवा सुविधा मिळत नसल्याने आता शासन, प्रशासनास जाब विचारण्यासाठी २७ डिसेंबर पासून मालवण ग्रामीण रुग्णालय समोर आपण आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिला आहे.
मंदार केणी यांनी दिलेल्या निवेदनात सूचीत केले आहे की मालवण रुग्णालयात आठवड्यातून एकदा नेत्रतपासणी व हायड्रोसिल हर्निया तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध होतील असे सांगूनही आरोग्य प्रशासनाने तशी कोणतीच नियमीत कृती सुरू केली नाही. तसेच शस्त्रक्रिया सुविधा जी नेवी आरोग्य शिबिर वेळी रुग्णालयात करण्यातआली तशीच नियमित स्वरूपात असावी. काही औषधांचा कायमच तुटवडा रुग्णांना जाणवतो तोही दूर व्हावा. या सर्व सणस्या प्रशनी शासन प्रशासन यांचे लक्ष वेधून जाब विचारण्यासाठी आपण मालवण ग्रामीण रुग्णालय समोर उपोषण तथा आंदोलन छेडणार असल्याचे मंदार केणी यांनी स्पष्ट केले आहे.