सहज_विना…!
सहज जन्म होती….सहज घडती गोष्टी…. भाव सहज उमटी…..प्रयासाविना…..!
सहज जमतो खेळ….सहज मित्रमेळ….. सहज बोरं भेळ…निर्जंतुकाविना..!
सहज मुखी भाष्य…..सहज सुखी हास्य… शिवाशिवी दृष्य…..शिवल्याविना…!
सहज शिक्षण बाल्य….पालकांचे पाल्य…. नसे तीक्ष्ण शल्य……उपहासाविना….!
आब्रु आणि कौतुकं..सर्व नतमस्तक…. भेद पोकळ हस्तक…वापराविना…..!
येता तरुण शैशव….देश दिशांचा ठाव…. जो तो शोधी वाव….विचाराविना…!
घात आणि घातक….जाच आणि जाचक…. संकल्पना मारक….संवेदनेविना…..!
मध्यान्ही सूर्य येतो…शरीर जला कळतो…. काळजीग्रस्त जाळतो….सुजलाविना..!
‘अखेर’ हेची आकार….बाकी निराकार…. मनी हाहा:कार..प्रायश्चित्ताविना…!
एक जन्म होता….होता की तोही नव्हता…. नसे कोण समता…प्रलोभनाविना…..!
गाठी गात्र थकले….अनुभव थोर साठले… शाश्वती शून्य दाटले….विवेकाविना…!
आयुष्य खर्ची गेले…करण्याच न भले… मृतदेहा हार आले….विजया विना..!
आकार ज्यासी कळला….सकार त्यासी कळला…. बाकी ठोका हलला….संवाद विना…..!
कर्माचीच जंत्री….जीवनाचे यंत्री… खंत पाताळयंत्री…मोक्षाविना…!
संत ,अंत नाही…अंत ,संत नाही….. त्रिखंडी भोग पाही….खंडाविना…!
सहज वाच़ा मधुर…कृत्रीम ती हो साखर…. सद्भावनेचा वावर..खचविण्याविना..!
कवी : वैश्रीसुयोग.