मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्ती भावात साजरी झाली. त्रिपुरारी पौर्णिमेस महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता पुरोहित मंदार व मोहनराव पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत स्वामींची काकड आरती संपन्न झाली. तदनंतर स्वामी भक्तांच्या दर्शनाकरता मंदिर खुले करण्यात आले. दिवसभर हजारो भाविकांनी श्री स्वामींचे दर्शन घेतले. अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, व मुंबई पुण्यातील स्वामी भक्त यांच्या वतीने येथील वटवृक्ष मंदीर व देवस्थानच्या भक्त निवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी दिपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या दिपोत्सवात उजळलेले मंदीर परिसर व भक्त निवासाचे नयन मनोहरी दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे व लक्षवेधी ठरले. या दिपोत्सवाचे शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व ब्रम्हांड नायक चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश गोवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी द्वापार युगापासूनच हिंदू धर्मात दिपोत्सवास मानाचे स्थान आहे. मानवी जीवनातील अंधकार दूर होवून जीवनात नवचैतन्य निर्माण होण्याकरीता हा दिपोत्सव पुर्वापार परंपरेनुसार साजरा होत आला आहे. दिपावली व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आजही राज्यभरातील अनेक भाविक येथे एकत्र येवून जीवनातील अंधकारमय विचारसारणीवर मात करून जीवनात नवचैतन्य प्राप्त करण्याकरीता या दिपोत्सवाच्या माध्यमातून स्वामींचे आशिर्वाद घेवून खऱ्या अर्थाने जीवन सुख समृध्द करून घेतात असे भावोद्गार व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विजयकुमार कडगंची, राजेश गोवर्धन, संजय पाठक, महादेव तेली, चंद्रकांत गवंडी, शिवशरण अचलेर, रवि मलवे, गिरीश पवार, मल्लीनाथ बोधले, रमेश घोसले आदींसह उस्मानाबाद, पुणे, मुंबई, बार्शी येथून पायी चालत आलेले अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -