मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथील सागरी महामार्गालगतच्या ‘हाॅटेल आराध्य’ येथे उद्या सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातून आयोजीत केलेल्या या शिबिरात आधारकार्ड नोंदणी, आधार कार्ड वरील दुरुस्ती, आधार कार्ड मोबाईलला लिंक करणे व आधार कार्ड विषयक इतर सर्व प्रक्रिया करण्यात येणार आहेत.
यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, सर्व्हिस ओळखपत्र, शासकीय ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक, शाळा ओळखपत्र ( यापैकी कोणताही एक ).
पत्ता पुरावा : मतदान कार्ड,
बँक पासबुक, लाईटबिल …( ३ महिन्याच्या आतील), इन्शुरन्स पॉलिसी, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट फोटो
पाण्याचे बिल (३ महिन्याच्या आतील)
(टीप : बायोमेट्रीक फोटो अपडेट करणे यासाठी आईज स्कॅन १००/_ रुपये शुल्क व मोबाईलला लिंक करणे, नांवात बदल, पत्त्यात बदल यासाठी ५० /_रुपये शुल्क आकारले जाणार आहे.)
जास्तीत जास्त इच्छुक लोकांनी या शिबिराचा उद्या १८ नोव्हेंबरला सकाळी १० ते संध्याकाळी ५ वेळेत धुरीवाडा येथील ‘हाॅटेल आराध्य’ येथे लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.