24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

ते आले, स्थिरावले, झेपावले, पुन्हा येऊन स्थिरावले, घोंघावले आणि पुन्हा झेपावत मार्गस्थ झाले..!

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर काल गुरूवारी सकाळी ११च्या दरम्यान भारतीय वायू दलाचे एक विमान उतरले. त्या विमानाने सायंकाळी ५ वाजता चिपी विमानतळावरुन ते विमान पुन्हा हवेत झेपावले आणि विमानतळाला एक घिरटी घालून ते विमान मार्गस्थ झाले. काही वेळातच परत ते विमान माघारी येत विमानतळाच्या धावपट्टीवर काही वेळ स्थिरावत गोव्याच्या दिशेने रवाना झाले.

४ डिसेंबर २०२३ ला नौसेना दिनाच्या पार्श्वभुमीवर चिपी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी तसेच नाईट लॅन्डिंग यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी ते विमान आले असल्याचे सूत्रांकडून समजते.

मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गवर नौसेना दिन साजरा होणार आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, या प्रमुख व्यक्तींसह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहेत. त्यासाठी चिपी विमानतळावरील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असुन नाईट लॅन्डिंग सुविधाही बसविण्यात आली आहे. आता रात्री विमाने उतरणे व हवेत झेपावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी डिजीसीएची परवानगी मिळणे क्रमप्राप्त आहे. डिजीसीएचे पथक लवकरच चिपी विमानतळावरील नाईट लॅन्डिंग सुविधेची पाहणी करून हिरवा कंदिल देतील. त्यानंतर प्रत्यक्षात नाईट लॅन्डिंग विमानसेवा सुरू होईल. त्या पार्श्वभुमीवरच वायुसेनेच्या विमानाने गुरूवारी चिपी विमानतळाच्या धावपट्टीची हवाई पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत चिपी विमानतळ यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर काल गुरूवारी सकाळी ११च्या दरम्यान भारतीय वायू दलाचे एक विमान उतरले. त्या विमानाने सायंकाळी ५ वाजता चिपी विमानतळावरुन ते विमान पुन्हा हवेत झेपावले आणि विमानतळाला एक घिरटी घालून ते विमान मार्गस्थ झाले. काही वेळातच परत ते विमान माघारी येत विमानतळाच्या धावपट्टीवर काही वेळ स्थिरावत गोव्याच्या दिशेने रवाना झाले.

४ डिसेंबर २०२३ ला नौसेना दिनाच्या पार्श्वभुमीवर चिपी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी तसेच नाईट लॅन्डिंग यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी ते विमान आले असल्याचे सूत्रांकडून समजते.

मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गवर नौसेना दिन साजरा होणार आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, या प्रमुख व्यक्तींसह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहेत. त्यासाठी चिपी विमानतळावरील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असुन नाईट लॅन्डिंग सुविधाही बसविण्यात आली आहे. आता रात्री विमाने उतरणे व हवेत झेपावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी डिजीसीएची परवानगी मिळणे क्रमप्राप्त आहे. डिजीसीएचे पथक लवकरच चिपी विमानतळावरील नाईट लॅन्डिंग सुविधेची पाहणी करून हिरवा कंदिल देतील. त्यानंतर प्रत्यक्षात नाईट लॅन्डिंग विमानसेवा सुरू होईल. त्या पार्श्वभुमीवरच वायुसेनेच्या विमानाने गुरूवारी चिपी विमानतळाच्या धावपट्टीची हवाई पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत चिपी विमानतळ यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

error: Content is protected !!