25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

उद्या आमदार श्रीकांत भारतीय यांचा मालवण दौरा ; भाजप मार्फत पर्यटन विकासासाठी आणखीन विशेष प्रयत्न होणार.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र विधानसभेचे आमदार श्रीकांत भारती उद्या १७ नोव्हेंबरला मालवण शहर दौर्यावर येत आहेत. भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे .त्याच अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा येथे केली. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असूनही ऐतिहासिक दृष्ट्या व पर्यटन दृष्ट्या आवश्यक असणारा विकास या ठिकाणी झाला नाही ही बाब पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे (मालवण कुडाळ विधानसभा संयोजक)
यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर या संबंधित आवश्यक निधी आणि शाश्वत विकास पर्यटन दृष्ट्या विकास कसा होऊ शकतो हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार श्रीकांत भारतीय व डॉक्टर अमेय देसाई (महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सेल भाजपा) मालवण शहराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून पाहणी करण्यासाठी उद्या शुक्रवारी दिनांक १७ नोव्हेंबरला सकाळी १२ वाजता मालवण शहरात येत आहेत. हा दौरा पुढीलप्रमाणे आहे
सकाळी १२:३०: मोरया चा धोंडा येथे पाहणी व चर्चा.
दुपारी १.२० मालवण भारतीय जनता पार्टी कार्यालयाला भेट.

दुपारी १.५० वाजता राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाचा आढावा.

या दौऱ्यात प्रभाकर सावंत (जिल्हाध्यक्ष भाजपा), दत्ता सामंत (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा), अशोक सावंत (उपाध्यक्ष भाजपा), धोंडी चिंदरकर (तालुका अध्यक्ष भाजपा), बाबा मोंडकर (
जिल्हा प्रवक्ता भाजपा) उपस्थित राहणार आहेत तरी सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे विशेष आवाहन जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग, मालवण शहर प्रभारी श्री. विजय केनवडेकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र विधानसभेचे आमदार श्रीकांत भारती उद्या १७ नोव्हेंबरला मालवण शहर दौर्यावर येत आहेत. भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे .त्याच अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा येथे केली. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असूनही ऐतिहासिक दृष्ट्या व पर्यटन दृष्ट्या आवश्यक असणारा विकास या ठिकाणी झाला नाही ही बाब पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे (मालवण कुडाळ विधानसभा संयोजक)
यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर या संबंधित आवश्यक निधी आणि शाश्वत विकास पर्यटन दृष्ट्या विकास कसा होऊ शकतो हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार श्रीकांत भारतीय व डॉक्टर अमेय देसाई (महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सेल भाजपा) मालवण शहराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून पाहणी करण्यासाठी उद्या शुक्रवारी दिनांक १७ नोव्हेंबरला सकाळी १२ वाजता मालवण शहरात येत आहेत. हा दौरा पुढीलप्रमाणे आहे
सकाळी १२:३०: मोरया चा धोंडा येथे पाहणी व चर्चा.
दुपारी १.२० मालवण भारतीय जनता पार्टी कार्यालयाला भेट.

दुपारी १.५० वाजता राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाचा आढावा.

या दौऱ्यात प्रभाकर सावंत (जिल्हाध्यक्ष भाजपा), दत्ता सामंत (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा), अशोक सावंत (उपाध्यक्ष भाजपा), धोंडी चिंदरकर (तालुका अध्यक्ष भाजपा), बाबा मोंडकर (
जिल्हा प्रवक्ता भाजपा) उपस्थित राहणार आहेत तरी सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आजी - माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे विशेष आवाहन जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग, मालवण शहर प्रभारी श्री. विजय केनवडेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!