कणकवली | उमेश परब : शैक्षणिक वर्ष 2021 व 2022 साठी सामान्य परिचर्या आणि प्रसवीका अभ्यासक्रम तीन वर्षांसाठी ठाणे,पालघर,रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बारावी उत्तीर्ण व विज्ञान शाखेचे प्राधान्य अषलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी पुरुषांच्या सहा व महिलांच्या चौदा जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे अर्ज परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, पहिला मजला ,सेंट जाॅर्जेस हाॅस्पिटल ,मुंबई येथे उपलब्ध आहेत .हे अर्ज दिनांक 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर सकाळी 10 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.
तरी इच्छुकांनी तिथे जाऊन खुल्या वर्गासाठी रुपये शंभर व मागासवर्गीय वर्गासाठी रुपये पन्नास या शुल्काप्रमाणे अर्ज घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.