27.1 C
Mālvan
Tuesday, April 8, 2025
IMG-20240531-WA0007

मनसे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या वतीने दिवाळी २०२३ च्या औचित्याने उटणे व शिधा वाटप.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मनसेचे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या वतीने दिवाळी २०२३ निमित्ताने मालवण नगरपालिका सफाई कर्मचारी यांना दिवाळी निमित्ताने उटणे पाकिटांचे वितरण केले.

तसेच मालवणच्या फातिमा काॅनवेंटला भेट देऊन तिथल्या गरजू मुलां मुलींसाठी अन्नाचा शिधा देत दीपावली निमित्त ‘सकस आहाराची’ भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मनविसेचे तालुका अध्यक्ष संदीप लाड उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर म्हणाले की सफाई कर्मचारी हे आपले स्वच्छता दूत आहेत व त्यांचे आरोग्य निरामय रहावे ह्या संपूर्ण मनसे, मनविसे पदाधिकारी व मनसैनिकांची प्रामाणिक इच्छा आहे आणि काॅनवेंट मधील गरजू मुले ही महाराष्ट्राचीच भावी पिढी आहे त्यामुळे त्यांच्या आहार व आरोग्याच्या विषयासाठी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शक सेवेच्या विचारांनी यथाशक्ती काम करत राहू. यासाठी मालवण शहर मनसैनिक, माजी पदाधिकारी व मनविसे तसेच महिला सदस्यांचेही वेळोवेळी सामाजिक सहकार्य मिळतच राहील. संपूर्ण शहरालाही त्यांनी ‘दिवाळी २०२३’ च्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मनसेचे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या वतीने दिवाळी २०२३ निमित्ताने मालवण नगरपालिका सफाई कर्मचारी यांना दिवाळी निमित्ताने उटणे पाकिटांचे वितरण केले.

तसेच मालवणच्या फातिमा काॅनवेंटला भेट देऊन तिथल्या गरजू मुलां मुलींसाठी अन्नाचा शिधा देत दीपावली निमित्त 'सकस आहाराची' भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मनविसेचे तालुका अध्यक्ष संदीप लाड उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर म्हणाले की सफाई कर्मचारी हे आपले स्वच्छता दूत आहेत व त्यांचे आरोग्य निरामय रहावे ह्या संपूर्ण मनसे, मनविसे पदाधिकारी व मनसैनिकांची प्रामाणिक इच्छा आहे आणि काॅनवेंट मधील गरजू मुले ही महाराष्ट्राचीच भावी पिढी आहे त्यामुळे त्यांच्या आहार व आरोग्याच्या विषयासाठी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शक सेवेच्या विचारांनी यथाशक्ती काम करत राहू. यासाठी मालवण शहर मनसैनिक, माजी पदाधिकारी व मनविसे तसेच महिला सदस्यांचेही वेळोवेळी सामाजिक सहकार्य मिळतच राहील. संपूर्ण शहरालाही त्यांनी 'दिवाळी २०२३' च्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!