28.9 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

महाराष्ट्राचे सुपुत्र पॅरा कमांडो हवालदार खोत यांना सेवे दरम्यान वीर मरण.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र पॅरा कमांडो हवालदार पोपट भगवान खोत यांना मध्य प्रदेशातील जबलपूर येथे सेवे दरम्यान काल अपघाती वीर मरण आले . मध्य प्रदेशमधील जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या एका गाडीचा अपघात झाल्याची माहिती काल समोर आली. एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला असल्याचे आधी प्राथमीक वृत्त होते. जवानांची ही गाडी जबलपूरहून बंगळूरूला जात असताना एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. हवालदार पोपट भगवान खोत यांच्या सोबतचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हवालदार पोपट भगवान खोत यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.

सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गांवचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा (३४ वर्षे ) बुधवारी ८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याच्या पूर्वीच पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली. पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पोपट खोत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. पोपट खोत यांचे पार्थिव आज त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणले जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हवालदार पोपट खोत यांचे पार्थिव त्यांच्या मूळगांवी आणण्यात येणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र पॅरा कमांडो हवालदार पोपट भगवान खोत यांना मध्य प्रदेशातील जबलपूर येथे सेवे दरम्यान काल अपघाती वीर मरण आले . मध्य प्रदेशमधील जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या एका गाडीचा अपघात झाल्याची माहिती काल समोर आली. एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला असल्याचे आधी प्राथमीक वृत्त होते. जवानांची ही गाडी जबलपूरहून बंगळूरूला जात असताना एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. हवालदार पोपट भगवान खोत यांच्या सोबतचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हवालदार पोपट भगवान खोत यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.

सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गांवचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा (३४ वर्षे ) बुधवारी ८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याच्या पूर्वीच पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली. पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पोपट खोत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. पोपट खोत यांचे पार्थिव आज त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणले जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हवालदार पोपट खोत यांचे पार्थिव त्यांच्या मूळगांवी आणण्यात येणार आहे.

error: Content is protected !!