कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीकांना मिळणार सवलत.
राजापूर / प्रतिनिधी-कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रे करीता कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हयातील प्रत्येक गावांमधून अनेक वारकरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसचे ग्रुप बुकिंग करून प्रवासाचा लाभ घेतात. सदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक यांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत मिळणेच्या अनुषंगाने परिवहन मंत्र्यांना निवेदन देऊन सकारात्मक निर्णय
होण्याची मागणी केली होती.सदर मागणीच्या अनुषंगाने कार्तिकी एकादशी पंढरपूर येथे प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ वारकऱ्यांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीकांना सवलत मिळणार आहेत.त्यामुळे कोकणातील वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात असून शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आमदार राजन साळवी यांनी परिवहन मंत्र्यांचे आणि परिवहन विभागाचे आभार मानले आहे.