हाॅटेल रापण आणि मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेच्या संयुक्त सहकार्य व योगदानानाने आयोजीत सोहळ्यात अत्यावश्यक सामाजिक विचारांची झाली देवाण – घेवाण..!
उपक्रमाचे संकल्पक व हाॅटेल रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम यांनी ‘साप्ताहिक समृद्ध सायंकाळ सामाजिक उपक्रमाचे’ दिले सर्वांना खुले निमंत्रण.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणातील वायरी येथील हाॅटेल रापण ( रिसाॅर्ट रेस्टॉरंट) येथे शरद पोर्णिमा तथा कोजागिरी पोर्णिमा अत्यावश्यक सामाजिक जाणीव संवाद व चर्चेत संपन्न झाली. हाॅटेल रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम यांची संकल्पना असलेल्या हाॅटेल रापण मधील ‘समृद्ध संध्याकाळचा सामाजिक कट्टा’ या साप्ताहिक उपक्रमात शरद पौर्णिमेच्या निमित्ताने विशेष संगीत रजनीचेही आयोजन केले गेले. मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने या उपक्रमाला संयुक्त सहकार्य व योगदान दिले आहे.

शरद पोर्णिमा तथा कोजागिरी २०२३ च्या कार्यक्रमाच्या सुरवातीला या कार्यक्रमाचे व संगीत रजनीचेही सूत्रसंचालक संजय शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर या सामाजिक कट्टा मंचावर मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. सूत्रसंचालक संजय शिंदे यांनी उपस्थितांतील हाॅटेल रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम, मातृत्व आधार फाऊंडेशनचे पदाधिकारी दादा वेंगुर्लेकर, प्रा. डाॅ. सुमेधा नाईक, वायरी भूतनाथ उपसरपंच सौ. प्राची माणगांवकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सदस्या श्रीम. ममता तळगांवकर, युवती सेना प्रमुख अधिकारी व शिवप्रेमी समाजसेविका व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. शिल्पा खोत, व्यावसायिक व समाजसेवक श्री. श्याम झाड या सामाजिक मान्यवरांना मंचावर निमंत्रित केले. मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन स्वागत सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम यांनी या ‘समृद्ध संध्याकाळ च्या सामाजिक कट्टा’ या साप्ताहिक उपक्रमा मागिल उद्देश स्पष्ट केला. यावेळी ते म्हणाले की या कट्ट्यावर दर शनिवारी सायंकाळी एक सामाजिक विषय दिला जाणार असून उपस्थित सर्वांनी त्यावर त्यांचे दिलखुलास मत मांडावे असा या चळवळ स्वरुप प्रसन्न कार्यक्रमाचा उद्देश आहे. विशेष करुन स्त्रियांनी बोलते व्हावे व आत्मशोध, आत्मसामर्थ्य या जाणीवांची देवाण घेवाण व समंजस आनंदी जीवनासाठी प्रयत्न करणे यासाठी गप्पांमधून अनेक विषय सुलभतेने हाताळले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर सौ. शिल्पा यतीन खोत यांनी ‘आत्मन्मान’ ह्या या आठवड्यातील विषयावर त्यांची मते मांडताना घरगुती दुःखद प्रसंगातही त्यांच्या वडिलांनी दाखवलेला सकारात्मक सामाजिक कृतीचा अनुभव कथन केला. त्यानंतर प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांनी ‘महिला ही महिलेची शत्रू’ अशी समजूत ही केवळ अफवा असून ती सामाजिक सोयीने रचली गेलेली व चुकीची संकल्पना आहे असे स्पष्ट केले. सुधारणावाद म्हणजे वादविवाद नव्हे असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर उपस्थित श्रोत्यांपैकी सौ. राधिका मोंडकर यांनी स्त्रीला वैधव्य आल्यानंतर तिच्या अस्तित्वाकडे पहायच्या दृष्टीकोनात बदल करायची नितांत आवश्यकता आहे असे स्पष्ट केले व आयुष्यभर टापटीप राहिलेल्या स्त्रीने वैधव्य आल्यानंतर स्वतःची परवड का करुन घ्यावी असा सामाजिक सवालही केला. या नंतर प्राणीमित्र व पर्यावरण सेवक आनंद बांबार्डेकर यांनी पालक व आजची युवा पिढी याबाबत त्यांचे विचार मांडले.

या नंतर समाजातील काही मान्यवरांचा रापण रिसाॅर्ट व मातृत्व आधार फाऊंडेशन मार्फत सत्कार संपन्न झाला. त्यामध्ये नुकतेच तारकर्ली येथे समुद्र दुर्घटनेत काही जणांचा जीव वाचवलेले गणपत मोंडकर, माजी सैनिक आप्पा वराडकर, सौ. सायली, श्रीमती ममता तळगांवकर, आनंद बांबार्डेकर, मार्शल आर्ट प्रशिक्षक विजय केळुसकर, समुद्र व पर्यावरण कृती अभ्यासक जगदीश तोडणकर, व्यावसायिक राधिका मोंडकर, सौ. गांवकर, उपसरपंच प्राची माणगांवकर, माजी उपसरपंच सौ. झाड, आरोग्य स्वयंसेवी श्री ढोले बाबू यांचाही सत्कार संपन्न झाला.

या नंतर मालवणच्या आदर्श संगीत विद्यालय यांचा ‘स्वरचांदणे’ हा बहारदार गीत संगीत सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला ज्यात सूत्रसंचालन व गायक श्री संजय शिंदे, सौ. पराडकर, बालगायिका कु. मेस्त्री, श्री मेस्त्री व इतर संचाने उपस्थित सर्वांचे सूरांनी मनोरंजन केले. या दरम्यान सर्व उपस्थितांना हाॅटेल रापण व आयोजकां तर्फे सप्रेम दिलेला सुमधुर ‘फालुदा’ पेयाचा आस्वाद घेता घेता ही संगीत रजनी अनुभवता आली.
या कार्यक्रमाला हाॅटेल उद्योजक श्री मिलिंद झाड, पर्यावरण अभ्यासक प्रा. संजय वराडकर, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहिष्णू पंडित, श्री सुरेश बापार्डेकर, हाॅटेल व्यवस्थापन तज्ञ दीपक कुडाळकर, सामाजिक कार्यकर्त्या शांती तोंडवळकर, दिक्षा लुडबे, मुंबई भाजपचे हरेश देऊलकर, शिक्षक कला निवेदक प्रभूदास आजगांवकर तसेच वायरी भूतनाथ ग्रामस्थ, वायरी ग्रामस्थ, मालवणातील विविध क्षेत्रांतील नागरीक, हाॅटेल रापणचा कर्मचारी वृंद तसेच मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, संस्थापक सदस्य व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल संकल्पक व हाॅटेल रापणचे निर्माते तथा मालक श्री भूषण साटम यांनी मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेच्या संयुक्त सहकार्याचे, उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि या साप्ताहिक उपक्रमाला दर शनिवारी सायंकाळी येऊन एका सामाजिक विषयावर समंजसपणे गप्पा मारत आत्म सामर्थ्याची जाणीव अनुभूती घ्यायचे निमंत्रण दिले.