24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

अंगणवाडी सेविकांसाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत नवीन फोन, पदोन्नती आणि इतर सुविधांची केली घोषणा ; प्रधानमंत्री मातृवंदन योजना.

- Advertisement -
- Advertisement -

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाखो महिला व बाळांचे सेवक झाले आहेत असे केले प्रतिपादन ; आशा सेविकांसाठी मानधनात वाढ करायचीही घोषणा.

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका या मिळणारे तुटपुंजे वेतन, कामाचा ताण, कमी भत्ता अशा अनेक कारणांमुळे त्रस्त असल्याच्या वारंवार तक्रारी येत असतात परंतु त्या निष्ठेने व मायेने त्यांच्या सेवेत कार्यरत असतात. दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदन योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यावेळेस उपस्थितीत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाखो महिला आणि बाळांचे सेवक झालेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाद्वारे ३ कोटी ५० लाख महिला याद्वारे जोडल्या गेल्या आहेत. या महिलाच्या खात्यात १४ हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. या महिलांपर्यंत पोहचणाऱ्या आशा वर्कर्सचे त्यांनी आभार मानले. मात्र आई नसताना, बहिण नसताना, नर्स नसताना ही त्या महिलांच्या घरी जाऊन त्याची नोंद ठेवतात, याचे त्यांनी कौतुक केले. या महिला शक्ती असून त्यांना पैशाच्या तराजून मोजता येणार नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आदिवासी विभागामध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचे काम सुरु असणे हे खरेच अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

अंगणवाडीच्या हेल्पर म्हणून काम करणाऱ्या ३ हजार सुशिक्षित महिलांना तात्काळ पदोन्नती दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यासोबतच त्यांना ११ हजार ८०० रुपये प्रत्येक नव्या फोनसाठी पाठवले जातील. यातून सर्वांना नवे फोन दिले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. अंगणवाडी महिलांना विमा सुरक्षा सुद्धा दिली जाणार असून या विम्याचे पैसे सरकार भरणार असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. महिला सशक्ती करणाबाबत आदीती तटकरे व मंगलप्रभात लोढा यांनी एकत्रित बसून काय करता येईल ते सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच राज्यात १ हजार पाळणाघर सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निर्भया फंडसाठी कुठलीही कमतरता राहणार नसून केंद्राकडून सर्व सहकार्य केलं जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अंगणवाडी भाऊबीज पैसे मिळाले का असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. त्यावेळेस महिलांनी “पैसे मिळाले नाही”, असे एकसुरात सांगितले. “दिवाळी आधी तुम्हाला पैसे मिळतील. फाईलवर सही झाली आहे”, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबत मोबाईल देखील तुम्हाला मिळतील. आशा वर्कर्स यांनाही मानधन वाढ करु अशी घोषणाही त्यांनी केली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाखो महिला व बाळांचे सेवक झाले आहेत असे केले प्रतिपादन ; आशा सेविकांसाठी मानधनात वाढ करायचीही घोषणा.

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका या मिळणारे तुटपुंजे वेतन, कामाचा ताण, कमी भत्ता अशा अनेक कारणांमुळे त्रस्त असल्याच्या वारंवार तक्रारी येत असतात परंतु त्या निष्ठेने व मायेने त्यांच्या सेवेत कार्यरत असतात. दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदन योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यावेळेस उपस्थितीत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाखो महिला आणि बाळांचे सेवक झालेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाद्वारे ३ कोटी ५० लाख महिला याद्वारे जोडल्या गेल्या आहेत. या महिलाच्या खात्यात १४ हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. या महिलांपर्यंत पोहचणाऱ्या आशा वर्कर्सचे त्यांनी आभार मानले. मात्र आई नसताना, बहिण नसताना, नर्स नसताना ही त्या महिलांच्या घरी जाऊन त्याची नोंद ठेवतात, याचे त्यांनी कौतुक केले. या महिला शक्ती असून त्यांना पैशाच्या तराजून मोजता येणार नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आदिवासी विभागामध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचे काम सुरु असणे हे खरेच अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

अंगणवाडीच्या हेल्पर म्हणून काम करणाऱ्या ३ हजार सुशिक्षित महिलांना तात्काळ पदोन्नती दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यासोबतच त्यांना ११ हजार ८०० रुपये प्रत्येक नव्या फोनसाठी पाठवले जातील. यातून सर्वांना नवे फोन दिले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. अंगणवाडी महिलांना विमा सुरक्षा सुद्धा दिली जाणार असून या विम्याचे पैसे सरकार भरणार असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. महिला सशक्ती करणाबाबत आदीती तटकरे व मंगलप्रभात लोढा यांनी एकत्रित बसून काय करता येईल ते सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच राज्यात १ हजार पाळणाघर सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निर्भया फंडसाठी कुठलीही कमतरता राहणार नसून केंद्राकडून सर्व सहकार्य केलं जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अंगणवाडी भाऊबीज पैसे मिळाले का असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. त्यावेळेस महिलांनी "पैसे मिळाले नाही", असे एकसुरात सांगितले. "दिवाळी आधी तुम्हाला पैसे मिळतील. फाईलवर सही झाली आहे", असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबत मोबाईल देखील तुम्हाला मिळतील. आशा वर्कर्स यांनाही मानधन वाढ करु अशी घोषणाही त्यांनी केली.

error: Content is protected !!