विरोधक लवकरच पक्षाला काॅन्ग्रेस व समाजवादी पक्षात विलीन करतील अशी व्यक्त केली शक्यता ; गद्दार कोण व महागद्दार कोण हे जनतेला सूज्ञपणे माहीत असल्याचे केले प्रतिपादन.
मुंबई | ब्यूरो न्यूज : शिवसेनेचा ( शिंदे गट ) दसरा मेळावा २०२३ मुंबईतील आझाद मैदानावर सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दसरा मेळावा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा असल्याचे सांगितले. जिथे हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिथे मांडता येतात ती जागा म्हणजे शिवतीर्थ असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांचे काॅन्ग्रेसची असणारी जवळीक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांचे विचारांना मूठमाती देण्यासारखे आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले.
थोड्याच दिवसात विरोधक ‘गर्वसे कहो हम समाजवादी है, काॅन्ग्रेसी है ” सांगत विरोधक पक्ष विलीन करतील असाही टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला आहे.