कुडाळ | देवेंद्र गावडे :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, पिंगुळी इथल्या राऊळवाडी येथील विजय तुकाराम मेस्त्री या युवा कलावंताने वेंगुर्ले जवळील आरवली समुद्र किनारी ‘सागरतीर्थ’ येथे श्री देवी दुर्गा मातेचे वाळू शिल्प साकारले.

या वाळू शिल्पाला साकारण्यासाठी त्यांनी २.५ टन वाळूचा वापर केला. १३ ऑक्टोबरला अवघ्या ५ तासांत हे शिल्प त्यांनी साकारले.