ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ या सात दिवसांच्या कालावधीत आरोग्य विभागामार्फत मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत ३८ हजार ७२८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारनं निश्चित केलं असून मिशन कवच कुंडल या अभियानाची घोषणा केली आहे. त्यानुसार ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कवच कुंडल हे अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले आहे. या अभियानांतर्गत २६ हजार ६४८ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर १२ हजार ८० नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत ८ ऑक्टोबर रोजी ९ हजार ७८५ नागरिकांचे लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ६ हजार ६८५ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३ हजार १०० नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ९ ऑक्टोबर रोजी ७ हजार २२८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ४ हजार ५१२ नागरिकांना पहिला डोस व २ हजार ७१६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी ४ हजार ५१७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ३ हजार २४३ नागरिकांना पहिला डोस व १ हजार २७४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ११ ऑक्टोबर रोजी ४ हजार ७३२ नागरिकांचे लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ३ हजार ३५९ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर १ हजार ३७३ नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबर रोजी ४ हजार ५०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ३ हजार ११६ नागरिकांना पहिला डोस व १ हजार ३९१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी ४ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ३ हजार ३७९ नागरिकांना पहिला डोस व १ हजार १२१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १४ ऑक्टोबर रोजी ३ हजार ४५९ नागरिकांचे लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये २ हजार ३५४ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर १ हजार १०५ नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.