26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही होणार सत्कार.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने त्यांचा विशेष भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी २१ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हा सत्कार सोहळा होणार आहे. त्याचबरोबर उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा भिसे, संग्राम प्रभुगावकर, युवतीसेना प्रमुख समन्वयक अधिकारी सौ. शिल्पा खोत यांच्यासह शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, व युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही होणार सत्कार.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने त्यांचा विशेष भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी २१ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हा सत्कार सोहळा होणार आहे. त्याचबरोबर उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा भिसे, संग्राम प्रभुगावकर, युवतीसेना प्रमुख समन्वयक अधिकारी सौ. शिल्पा खोत यांच्यासह शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, व युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.

error: Content is protected !!