बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ डेगवेच्या वतीने आयोजित निमंत्रितांच्या भजनस्पर्धेत मुसळेश्वर भजन मंडळ मळेवाड यांचा प्रथम क्रमांक, श्री गणेश भजन मंडळ माजगांव यांचा दृतीय क्रमांक व सावंतवस भजन मंडळ इन्सुली यांचा तृतीय क्रमांक आला. तिन्ही विजेत्या मंडळाना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आयोजित निमंत्रितांच्या भजन मंडळाच्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन डेगवे सरपंच राजन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच मंगेश देसाई, माजी सरपंच मधु देसाई, प्रेमानंद चुडे देसाई, निवृत्त वाहतूक नियंत्रक मधुकर देसाई, उत्तम देसाई आदी सह मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून गोवा येथील संगीत शिक्षक दिगंबर गाड, अमेय गावडे व वीरेंद्र देसाई यांनी काम पाहिले.
यात प्रथम क्रमांक प्राप्त मुसळेश्वर भजन मंडळ मळेवाड यांना रोख ५ हजार ५५५ व चषक, दृतीय क्रमांक प्राप्त श्री गणेश भजन मंडळ माजगांव याना ३ हजार ३३३ रोख व चषक, तृतीय क्रमांक प्राप्त सावंतवस भजन मंडळ इन्सुली २ हजार २२२ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ यांना सन्मानित करण्यात आले. हार्मोनियम वादक म्हणून ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ मधील वासूदेव देसाई यांना, पखवाज वादक म्हणून मुसळेश्वर भजनी मंडळ मधील निहाल उक्षेकर यांना, तबलावादक म्हणून गणेश भजन मंडळ माजगांव मधील समीर धुरी यांना, गायक म्हणून मुसळेश्वर भजनी मंडळ मळेवाड मधील योगेश मेस्त्री याना, उत्कृष्ट झाजवादक म्हणून तुषार देसाई याना सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा मंडळाचे अध्यक्ष पंकज देसाई, तात्या स्वार, वीरेंद्र देसाई, सत्यम शेटकर, सचिन सावंत यांच्या सहकार्याने मंडळाने वतीने आयोजित केली होती.