विशेष वृत्त
कणकवली | उमेश परब : “कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री शरदाच्या चांदण्यात ,चंद्र त्याच्या किरणांतून अमृत बरसवत असतो….आणि तेच किरण गोड दुधात पडले की ते दूध चित्त,आरोग्य आणि अध्यात्म यांची शांती बहाल करते…दुधाची स्निग्धता शरीराला पुष्टी देते आणि अमृताचे माधुर्य सर्व वाईट विचार,कृती यांपासून मानवाला परावृत्त करते”, असे पूर्वीपासूनचे सांगणे आहे. बाकी त्याला वैज्ञानिक आधार किती आहे हे आजची पिढी जाणतेच परंतु त्यातल्या संदेशालाही आजची पिढी किती सजगतेने समजू लागुन स्वतःच्या निरामय आरोग्य व जीवनाचे खरेखुरे ‘कोजागिरी डिसायडर्स’ ठरतायत ते कणकवलीचे तडफदार ‘कनक रायडर्स…!’ आजचा तरुण उद्याचे देशाचे भविष्य हे जाणून या कनक रायडर्सनी कोजागिरी साजरी करायची एक अनोखी पद्धत जगातील सर्वांनाच दाखवली आहे . तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन वाममार्गाला लागत आहे असा खूपदा अनुभव येतो. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तर हा प्रकार आपल्या सर्वांनाच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. लहान मुले सदैव मोठ्या माणसांचे अनुकरण करत असतात यासाठी आदर्श म्हणून सायकलिंग ची आवड मुलांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी व समाजातील एक जबाबदार घटक म्हणून कनक रायडर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी ” तंदुरुस्तीची सवारी” तथा राइड फार फिटनेसचा संदेश देत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एकत्र येऊन शंभर किलोमीटर ची सायकल राईड पूर्ण केली. या राईड मध्ये कनक रायडर्स चे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, कैलास सावंत, संजय बिडये, योगेश महाडिक, संतोष कांबळे, उमेश मोरे, प्रतीक सावंत, संदेश मयेकर, नितांत चव्हाण, बाळू मेस्त्री, सिद्धेश सावंत हे रायडर्स सहभागी झाले होते. अशीही काव्य ,गीत ,संगीत यासोबतच आता अशी कोजागिरी साजरी करता यायचे हे ” कोजागिरीचे डिसायडर्स” म्हणून आता जिल्ह्यात “कनक रायडर्स” नक्कीच नविन पायंडा पाडून जातायत.