24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सुनील गावसकर भडकले ; बीसीसीआयला दिला ‘घरचा आहेर..!’

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज | क्रीडा : भारतात सध्या २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. भारतातील १० शहरांमध्ये हा विश्वचषक पार पडतोय. स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांना इतर विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत तुलनेने कमी प्रेक्षक लाभले. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भारताचे माजी कसोटीपटू, विक्रमवीर तसेच माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त करत परखड मत मांडले आहे. या विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता.

तब्बल १ लाख ३० हजारपेक्षा जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमवर सुरुवातीला अगदी दोन ते तीन हजार प्रेक्षकच उपस्थित झाले होते. सायंकाळच्या सत्रात प्रेक्षकांची संख्या वाढलेली दिसली. हा अधिकृत आकडा ४७ हजार असल्याचे सांगण्यात आलेले. त्यानंतर पाकिस्तान व नेदरलँड्स यांच्यातील सामन्याला सुद्धा तुरळक प्रेक्षक दिसले. याव्यतिरिक्त बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान या बर्यापैकी महत्वाच्या सामन्याला देखील प्रेक्षकांची म्हणावी तितकी संख्या दिसली नव्हती. या संपूर्ण मुद्द्यावर बोलताना गावसकर म्हणाले की एक क्रीडाप्रेमी, क्रिकेटप्रेमी आणि भारतीय क्रिकेटपटू म्हणून मला याची लाज वाटते व मनोमन खंत व संताप वाटत आहे. प्रेक्षक व अस्सल क्रिकेट खेळाचा प्रसार या आघाड्यांवर हा विश्वचषक सर्वात अपयशी सिद्ध होईल अशी भीती वाटते. कमी प्रेक्षक, कोणत्याही प्रकारचे ठळक स्कोर बोर्ड नाहीत आणि अत्यंत ढिसाळ नियोजन बीसीसीआयकडून केले गेले आहे. हा विश्वचषक ज्याप्रकारे जवळ येत होता तशा प्रकारे बीसीसीआय व आयसीसी संभ्रमात असलेले दिसून येत होते. सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अचानक बदल करण्यात आला. तसेच तिकिटांची विक्री अगदी पारंपारिक पद्धतीने केली गेली. तसेच काहींना नोंदणी करून देखील मिळाली नाही अशी सोशल मीडियावर चर्चा झालेली आहे.”

माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांच्या आयोजनावरील या परखड टीकेमुळे बीसीसीआयच्या पदाधिकारी वर्गाला, प्रेक्षकसंख्येसाठी आता काही ठोस पावले उचलावी लागतील असाच घरचा आहेर माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी दिला असल्याचे क्रीडा विश्लेषकांचे मत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्युरो न्यूज | क्रीडा : भारतात सध्या २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. भारतातील १० शहरांमध्ये हा विश्वचषक पार पडतोय. स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांना इतर विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत तुलनेने कमी प्रेक्षक लाभले. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भारताचे माजी कसोटीपटू, विक्रमवीर तसेच माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त करत परखड मत मांडले आहे. या विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता.

तब्बल १ लाख ३० हजारपेक्षा जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमवर सुरुवातीला अगदी दोन ते तीन हजार प्रेक्षकच उपस्थित झाले होते. सायंकाळच्या सत्रात प्रेक्षकांची संख्या वाढलेली दिसली. हा अधिकृत आकडा ४७ हजार असल्याचे सांगण्यात आलेले. त्यानंतर पाकिस्तान व नेदरलँड्स यांच्यातील सामन्याला सुद्धा तुरळक प्रेक्षक दिसले. याव्यतिरिक्त बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान या बर्यापैकी महत्वाच्या सामन्याला देखील प्रेक्षकांची म्हणावी तितकी संख्या दिसली नव्हती. या संपूर्ण मुद्द्यावर बोलताना गावसकर म्हणाले की एक क्रीडाप्रेमी, क्रिकेटप्रेमी आणि भारतीय क्रिकेटपटू म्हणून मला याची लाज वाटते व मनोमन खंत व संताप वाटत आहे. प्रेक्षक व अस्सल क्रिकेट खेळाचा प्रसार या आघाड्यांवर हा विश्वचषक सर्वात अपयशी सिद्ध होईल अशी भीती वाटते. कमी प्रेक्षक, कोणत्याही प्रकारचे ठळक स्कोर बोर्ड नाहीत आणि अत्यंत ढिसाळ नियोजन बीसीसीआयकडून केले गेले आहे. हा विश्वचषक ज्याप्रकारे जवळ येत होता तशा प्रकारे बीसीसीआय व आयसीसी संभ्रमात असलेले दिसून येत होते. सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अचानक बदल करण्यात आला. तसेच तिकिटांची विक्री अगदी पारंपारिक पद्धतीने केली गेली. तसेच काहींना नोंदणी करून देखील मिळाली नाही अशी सोशल मीडियावर चर्चा झालेली आहे."

माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांच्या आयोजनावरील या परखड टीकेमुळे बीसीसीआयच्या पदाधिकारी वर्गाला, प्रेक्षकसंख्येसाठी आता काही ठोस पावले उचलावी लागतील असाच घरचा आहेर माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी दिला असल्याचे क्रीडा विश्लेषकांचे मत आहे.

error: Content is protected !!