आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथील भगवंतगड येथे महाश्रमदान स्वच्छता अभियान आयोजीत करण्यात आले होते. भारतीय केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंढरावडा अंतर्गत, ‘एक तारीख, एक घंटा, एक साथ’ तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील गांव, तालुका व पंचायत समिती स्तरावर कचरामुक्तीसाठी श्रमदान कार्यक्रम राबविण्याच्या दिलेल्या सूचना आणि ‘एक तारीख, एक तास, महाराष्ट्र बनवूया खास’ हा उपक्रम गावो गावी राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार चिंदर ग्रामपंचायत, जिल्हा व तालुका प्रशासन यांच्या सहकार्याने महाश्रमदान अभियान चिंदर ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच किल्ले भगवंतगड येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, मालवण तहसिलदार सौ. वर्षा झाल्टे-भोसले, मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, चिंदर सरपंच सौ. स्वरा पालकर यांच्या उपस्थितीत राबवण्यात आला.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विशाल तनपुरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्वच्छता विनायक ठाकूर, मंडल अधिकारी अजय परब, कार्यकारी अभियंता नळपाणी पुरवठा अनिल कुमार महाजनी, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, केदार परुळेकर, जान्हवी घाडी, माजी सभापती हिमाली अमरे, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, दिगंबर जाधव, प्रिया पालकर, मोरेश्वर गोसावी, निलिमा घाडी, साधना पाताडे, नंदिनी पावसकर, विश्राम माळगांवकर, समिर अपराज, सिध्दू नाटेकर, जिल्हा, तालुका प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका असे मोठ्या संख्येने उपस्थित होते.