24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण ग्रामीण रुग्णालयाकडे गंभीरतेने लक्ष द्या आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या सुविधा द्या ; भाजप कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांची मागणी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्याचे आरोग्य मंत्री , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याकडे मालवण ग्रामीण रुग्णालयाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे व अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या तात्काळ उपलब्धतेची मागणी केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सि टी स्कॅन , एम आर आय आणि सोनोग्राफी मशीन ही उपकरणे त्वरित आवश्यक असून ती शासनाने आणि आरोग्यमंत्र्यांनी उपलब्ध करावीत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश बापर्डेकर म्हणतात की,एखादा खेडेगांवातील व शहरातील आजारी , गरीब नागरिक त्याची परिस्थिती अत्यंत बिकट असेल आणि त्यांना खाजगी रुग्णालयात असो अगर सरकारी रुग्णालय असो तो अती गंभीर आजारी असताना उपचार करत असते वेळी डॉक्टर जर म्हणाले की यांचा एम आर ए करावे लागतील किंवा सिटी स्कॅन तथा सोनोग्राफी त्वरित करावी लागेल तर सध्या याला पर्याय म्हणजे एकतर कुडाळ अगर कणकवली येथे जाणे आहे. मग अशावेळी रुग्णाला टेन्शन येतच त्यापेक्षा नातेवाईकांची स्थिती हडबडून जाते . मालवण कुडाळ प्रवास खर्च आणि सी टी स्कॅन अगर एम आर आय, सोनोग्राफी काढण्यासाठी प्रवास खर्च आणि इतर येणारा खर्च हा हजारो रुपये होतो. त्यामध्ये पेशंटला नाहक प्रवासाचा त्रास व व्याप सहन करावा लागतो. त्यात करून एवढे खर्च करूनही कित्येक वेळा आपले आई ,वडील ,भाऊ ,बहिण अन्य यांना कुडाळ, कणकवली येथे नेतेवेळी अगर घेऊन येते वेळी त्याच रस्त्यात जर बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असेल असा सवाल बापार्डेकर यांनी केला आहे.

तसेच याच मालवण तालुक्यातील मालवण शहरात ग्रामीण रुग्णालयात एक्सरे काढला की तो साधा पेपर वर दिला जातो. तर तो पेपर साधा असल्याने रुग्णालयात चेकप अगर अन्य गोष्टी चेक करायला आल्यावर कोणताही एक्सरे काढल्यावर त्यावर फोटो कॉपी त्यावेळी सुस्पष्ट दिसत नसल्याने शेवटी पांढरा पेपर असतो. परंतु जर एक्सरेला लागणारे साहित्य पुरवीत नाही तेथील ऑपरेटर अधिकारी काय करणार यासर्व गोष्टीची कमतरता नागरिक रुग्णांना भासत आहे. जर हे ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव भासत असेल तर मुख्य रुग्णालय ओरोस हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रुग्णालय आहे त्याठिकाणी सर्व उपकरणासह त्याला लागणारे ऑपरेटर अधिकारी डॉकटर उपलब्ध करून चालू करावे जेणे करून नागरिक यांची कोणतीही यापुढे ऑपरेटर अधिकारी नाहीत मशीन बंद आहेत ही कारणे पुढे नसावीत .

यासाठीच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांना या पेशंट आणि नागरिक यांच्या तळमळ आणि काळजी लक्षात घेऊन त्यांच्या वतीने भाजप कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे लवकरात लवकर राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी त्वरित अमंलबजावणी करून मालवण ग्रामीण रुग्णालयात सर्व उपकरणे तथा मशीन सुविधा, एम आर आय, सोनोग्राफी आणि सी टी स्कॅन मशीन त्याबरोबर एक्सरे करिता लागणारे साहित्य त्वरित उपलब्ध करावे अशी मागणी केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!