मालवण | सुयोग पंडित : आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह हा निर्मिती पासूनच ‘खरी पत्रकारीता’ जपतो आहे हे उद्गार एका नुकतेच निवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षकांचे आहेत..लवकरच त्यांची व्हिडिओ मुलाखत चॅनेलवर दिसेलच.
पण जेंव्हा ‘निर्मिती’ शब्द येतो तेंव्हा मुख्य संपादक म्हणून कार्यरत असताना आपली सिंधुनगरी समूहाचे प्रमुख संचालक श्री विजय रावराणे, सौ फिलोमीना पंडित, प्राध्यापक दिनेश किडये यांचे योगदान हेच चॅनेलचे मूळ आहे. कै .श्रीनिवास पंडित यांचे सटीक मार्गदर्शन हे चॅनेल निर्मितीचे वैशिष्ट्य होते. या आपली सिंधुनगरी चॅनेलला इतर “बातम्यांचे चॅनेल शिवाय असणारी प्रसारण सेवा” ही चॅनेलच्या प्रमुख मालक व संकल्पक साहित्यिक सौ. वैशाली पंडित यांचे निर्मळ स्वप्न होते म्हणून कदाचित आपली सिंधुनगरी चॅनेल समूहात जोडलेल्या एकाही प्रतिनिधीला ‘रोज पोलीस ठाण्यात’ जाऊन बातमी करायची गरज भासत नाही.
आपली सिंधुनगरीचे सर्जनशील विभाग प्रमुख तथा मालक सहिष्णू पंडित सध्या विविध टप्प्यांनुसार प्रकल्प राबवत आहेत..त्यातच श्री गणेश आरती संग्रह हा प्रकाशीत झाला. स्वतः मालक सहिष्णू पंडित, संचालक फिलोमीना पंडित व चॅनेलच्या डिजीटल संचालक यांनी मिळून ‘ना नफा ना तोटा’ धर्तीवर आरती संग्रह प्रकाशित केला.
हा आरती संग्रह ‘त्रिगुणात्मक तथा बाप..पुत्र आणि पवित्र आत्मा’ असा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे.