28.2 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

अंकिता प्रसाद लोके हिची आत्महत्या ; पतीच्या निर्घृण खूनानंतर अवघ्या ४ दिवसांत संपवले जीवन.

- Advertisement -
- Advertisement -

पोलीस तपास सुरू ; संपूर्ण जिल्ह्यात खळबळ.

देवगड | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रमिठबाव येथील प्रसाद लोके या युवकाच्या निर्घृण खूनाने जिल्हा हादरलेला असतानाच आता अवघ्या ४ दिवसात मृत प्रसाद लोके यांची पत्नी अंकिता प्रसाद लोके हिने गळफास लावून आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत देवगड पोलिसांना कळविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.

मयत अंकिता प्रसाद लोके ही मिठवाब येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपली होती. पहाटे तिच्या आईला जाग आली तेव्हा अंकिता लोके तिच्या बाजूला नसल्याचे लक्षात येताच तिने घरातील सर्वांना याची कल्पना दिली. नंतर घरात सर्वत्र शोधाशोध केली असता टेरेसवर ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत अंकिता प्रसाद लोके आढळून आली. प्रसाद लोकेच्या निघृण खूना पाठोपाठ त्याच्या पत्नीच्याही निधनाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पोलीस तपास सुरू ; संपूर्ण जिल्ह्यात खळबळ.

देवगड | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रमिठबाव येथील प्रसाद लोके या युवकाच्या निर्घृण खूनाने जिल्हा हादरलेला असतानाच आता अवघ्या ४ दिवसात मृत प्रसाद लोके यांची पत्नी अंकिता प्रसाद लोके हिने गळफास लावून आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत देवगड पोलिसांना कळविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.

मयत अंकिता प्रसाद लोके ही मिठवाब येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपली होती. पहाटे तिच्या आईला जाग आली तेव्हा अंकिता लोके तिच्या बाजूला नसल्याचे लक्षात येताच तिने घरातील सर्वांना याची कल्पना दिली. नंतर घरात सर्वत्र शोधाशोध केली असता टेरेसवर ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत अंकिता प्रसाद लोके आढळून आली. प्रसाद लोकेच्या निघृण खूना पाठोपाठ त्याच्या पत्नीच्याही निधनाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!