25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी शिवभक्तांनी घेतली पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या अरबी समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा म्हणून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने शिवभक्तांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात मागणी करण्यात आली की केंद्र सरकारच्या वतीने ४ डिसेंबर २०२३ला नौसेना दिन किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा होत आहे. यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्गु यांच्या प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. यासाठी नौदलाने ने आपली तयारी चालू केली असून किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चिती चालू आहे. किल्ले सिंधुदुर्ग वर महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेक किल्ले सिंधुदुर्ग वरील जमीन मालक तयार असताना स्थानिक जिल्हा प्रशासन या किल्ल्यावर जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून पुतळा किल्ले सिंधुदुर्ग व्यतिरिक्त उभारण्याच्या तयारीत आहेत हे तमाम देश विदेशातील शिवप्रेमी वर अन्याय करण्यासारखे आहे. या संबंधी आपण विशेष लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना सदर पुतळा किल्ले सिंधुदुर्ग वर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत ही विनंती कारण्यात आली आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे हे उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यांनी सूचित केले की सदर जागेसाठी प्रशासन गेले तीन महिने प्रयत्न करत असून शासनाने प्रयत्न करूनही जमीन मालकांची अजून संमती आली नाही अन्य किल्ल्यावर असलेले जागा मालक तयार असून त्याजागी पुतळा उभारणी शक्य नाही त्यामुळे हे मालक तयार न झाल्यास सिंधुदुर्ग किल्ला व्यतिरिक्त ३ ते ४ जागेत पुतळा उभारणी साठी माहिती घेणे चालू आहे यावेळी शिवभक्तांनी किल्ले सिंधुदुर्ग वरच पुतळा उभारला जावा अशी मागणी शिवभक्त शिष्टमंडळांनी केली यावेळी श्री सूर्यकांत फणसेकर, श्री अवि सामंत, श्री किशोर दाभोळकर, श्री रवींद्र खानविलकर, श्री मंगेश जावकर, श्री मिलिंद झाड, श्री रुपेश प्रभू, श्री अभय पाटकर श्री दादा वेंगुर्लेकर श्री सौरभ ताम्हणकर, श्री कोयंडे, श्री सुरेश बापर्डेकर, श्री अविनाश पराडकर, श्री आशिष हडकर आदी शिवभक्त उपस्थित होते. पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी या संदर्भात माध्यमांना सविस्तर माहिती दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!