माईन ग्रामपंचायत यांच्या वतीने श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व श्री माऊली क्लीनिकल लॅब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत सामाजिक उपक्रम.
कणकवली | प्रतिनिधी : पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत माईन यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीर व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणाले गावातील महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. ८ सप्टेंबरला आरोग्य शिबिराचे तर १३ सप्टेंबरला कौशलवृद्धी प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले होते. गांवातील अनेक महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबिरात सर्व महिलांचे रक्तातील अनेक तपासण्या, ब्लड प्रेशर व इतर रुटीन चेकअप करण्यात आले.
कौशल्यवृद्धी प्रशिक्षणामध्ये गांवातील महिलांना निळ, फिनेल, लिक्विड सोप, डिटर्जंट पावडर, आईस केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सर्व आरोग्य तपासण्यांचे रिपोर्ट लाभार्थ्यांना पोच करण्यात आले तर प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच नीतीशा पाडावे, ग्रामसेवक वर्षा जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमोल घाडीगांवकर, वैभवी तांबे, शाश्वती राणे, नितीन पाडावे, श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री नवलराज काळे, प्रशिक्षक स्नेहा कामत, सौ संजना कोंडविलकर, सागर घाडीगांवकर, प्रशांत आडेळकर, जयराम गावकर, सूरज घाडीगांवकर, गणेश गांवकर, राजदीप पवार, शायरी दहिबावकर, विद्या आचरेकर सूरज घाडीगांवकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.