खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शेठ न म विद्यालयाच्या एनसीसी विभागातील कॅडेट आर्या मोसमकर व कॅडेट पूनम चांदिलकर यांची संगीत व कला या सांस्कृतिक प्रकारात कोल्हापूर येथे होणाऱ्या प्री. आर. डि. सी. कॅम्प साठी निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ५८ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी सिंधुदुर्ग येथे नुकतीच पार पडली.
कोल्हापूर येथील कॅम्प हा एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर येथे होणार आहे. १० दिवस हा कॅम्प असून या कॅम्प साठी निवड झाल्याबद्दल आर्या, पूनम यांचे कौतुक होत आहे. या दोघींनाही एनसीसी ऑफिसर राम कापसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप व पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत यांनी त्यांचे अभिनंदन करत कॅम्पसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.