संस्थान अध्यक्ष महेश बागवे यांनी वेधले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालवण तालुक्यातल्या मसुरे देऊळवाडा येथील जागृत देवस्थान ‘समर्थ बागवे महाराज’ संस्थान यांच्या श्री दत्त मंदिराचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ अंतर्गत विकास होण्यासाठी संस्थान अध्यक्ष महेश बागवे यांनी आंगणेवाडी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले. समर्थ बागवे महाराज संस्थान दत्त मंदिर येथे भक्त निवास व मंदिर सुशोभीकरण मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी माजी उपसभापती छोटू ठाकुर, शिवाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, काका आंगणे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.