
कुडाळ तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ‘आत्मा’ आणि माणगांव ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुआ तालुका कृषि अधिकारी कार्यालय व सिंधुदुर्ग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) आणि माणगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने माणगांव ग्रामपंचायत सभागृह येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. या रानभाजी महोत्सवाचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये सुमारे २५ बचत गटांमार्फत विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच रानभाज्या पाककला स्पर्धा घेण्यात आली. आमदार वैभव नाईक सर्व स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे काम कृषी अधिकारी करत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचून त्यांना लाभ घेता येतो. रानभाज्या व गावठी भाज्यांना इतर भाज्यांपेक्षा मागणी आहे. आपल्या आरोग्यासाठी रानभाज्या आवश्यक आहेत. रान भाज्यांचे संर्वधन करण्याचे काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पौष्टीक तृणधान्ये उत्पादन तंत्रज्ञान व पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता.


यावेळी कुडाळ तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर, सिंधुदुर्ग आत्मा प्रकल्प संचालक भाग्यश्री नाईकनवरे, सावंतवाडी उपविभागीय कृषी अधिकारी पी. पी. पाटील, माजी जि. प.सदस्य राजू कविटकर, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अतुल बंगे, माणगांव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच भिकाजी बागवे,युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, विभाग प्रमुख बंड्या कुडतरकर, रामा धुरी, रमाकांत धुरी,मथुरा राऊळ, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, संदीप सावंत, मुकुंद सरनोबत, बंटी भिसे, बाळा जोशी, गुरु गडकर,शैलेश विर्नोडकर,’ आत्मा प्रकल्प’ उपसंचालक नामदेव परीट, ‘आत्मा’ राज्यस्तरीय सदस्य बाजीराव झेंडे, ‘आत्मा’ कुडाळ अध्यक्ष सरिता बेळणेकर आदी उपस्थित होते.