25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केला ‘अंनिस’ चा निषेध…!

- Advertisement -
- Advertisement -

इस्रो’ चंद्रावर पोहोचली पण ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्या डबक्यातच असल्याचीही केली टीका…!

मालवण | प्रतिनिधी : चांद्रयान ३ च्या यशस्वी लॅन्डिंग नंतर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी अंनिस तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीकास्त्र सोडले आहे.
कालच ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात ‘इस्रो’ने ‘चांद्रयान ३’ चंद्रावर यशस्वीरित्या उतरवत इतिहास रचला. याबद्दल भारतातच नव्हे, तर जगभरात ‘इस्रो’ आणि ‘चांद्रयान’ मोहिमेत सहभागी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहेत. मात्र नेहमीच हिंदू धर्माला पाण्यात पहाणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या वेळीही हिंदु धर्मद्वेष प्रकट करण्याची संधी सोडली नाही. अंनिसवाल्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘चांद्रयान मोहिम यशस्वी होण्यासाठी पूजा, मंत्र, तंत्र, होम हवन उपयोगी ठरणार नसून अचूक तंत्रज्ञानच ही मोहिम यशस्वी करू शकेल’ अशी पोस्ट केली आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उपदेशाचे डोस देणारी अंनिस स्वतःला ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांपेक्षा मोठी समजते का ? जो धर्माचरण करतो, त्यालाच त्याचे लाभ कळतात. धर्माचरण न करताच ‘त्याने काही लाभ होत नाहीत’, असे म्हणणे ही अंनिसवाल्यांची ‘अंधश्रद्धा’च आहे. ‘इस्रो’ चंद्रावर पोहोचली; मात्र ‘अंनिस’ अजूनही अंधश्रद्धेच्या डबक्यातच आहे, अशीही पुस्ती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी जोडली आहे.

प्रत्येक कामाचा आरंभ हा देवतेच्या आशीर्वादाने करणे, त्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे. ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ हे त्यांची प्रत्येक अंतराळ मोहिम चालू करतांना त्या यानाची प्रतिकृती श्री तिरूपति येथील बालाजी मंदिरात ठेवून पूजाअर्चा करतात, तसेच यान अवकाशात सोडण्यापूर्वीही मुहूर्तावर आणि पूजाविधी करतात. आस्तिक असूनही विज्ञाननिष्ठ असणे, ही भारताची गौरवशाली परंपरा आहे; मात्र ‘देव दिसत नाही, म्हणजे तो अस्तित्त्वातच नाही’ असे समजणार्‍या अंनिसवाल्यांचे हे आंधळेपण आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उपदेश देणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आम्ही निषेध करत आहोत, असेही श्री. रमेश शिंदे यांनी सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'इस्रो’ चंद्रावर पोहोचली पण ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्या डबक्यातच असल्याचीही केली टीका…!

मालवण | प्रतिनिधी : चांद्रयान ३ च्या यशस्वी लॅन्डिंग नंतर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी अंनिस तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीकास्त्र सोडले आहे.
कालच ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात ‘इस्रो’ने ‘चांद्रयान ३’ चंद्रावर यशस्वीरित्या उतरवत इतिहास रचला. याबद्दल भारतातच नव्हे, तर जगभरात ‘इस्रो’ आणि ‘चांद्रयान’ मोहिमेत सहभागी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहेत. मात्र नेहमीच हिंदू धर्माला पाण्यात पहाणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या वेळीही हिंदु धर्मद्वेष प्रकट करण्याची संधी सोडली नाही. अंनिसवाल्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘चांद्रयान मोहिम यशस्वी होण्यासाठी पूजा, मंत्र, तंत्र, होम हवन उपयोगी ठरणार नसून अचूक तंत्रज्ञानच ही मोहिम यशस्वी करू शकेल’ अशी पोस्ट केली आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उपदेशाचे डोस देणारी अंनिस स्वतःला ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांपेक्षा मोठी समजते का ? जो धर्माचरण करतो, त्यालाच त्याचे लाभ कळतात. धर्माचरण न करताच ‘त्याने काही लाभ होत नाहीत’, असे म्हणणे ही अंनिसवाल्यांची ‘अंधश्रद्धा’च आहे. ‘इस्रो’ चंद्रावर पोहोचली; मात्र ‘अंनिस’ अजूनही अंधश्रद्धेच्या डबक्यातच आहे, अशीही पुस्ती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी जोडली आहे.

प्रत्येक कामाचा आरंभ हा देवतेच्या आशीर्वादाने करणे, त्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे. ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ हे त्यांची प्रत्येक अंतराळ मोहिम चालू करतांना त्या यानाची प्रतिकृती श्री तिरूपति येथील बालाजी मंदिरात ठेवून पूजाअर्चा करतात, तसेच यान अवकाशात सोडण्यापूर्वीही मुहूर्तावर आणि पूजाविधी करतात. आस्तिक असूनही विज्ञाननिष्ठ असणे, ही भारताची गौरवशाली परंपरा आहे; मात्र ‘देव दिसत नाही, म्हणजे तो अस्तित्त्वातच नाही’ असे समजणार्‍या अंनिसवाल्यांचे हे आंधळेपण आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उपदेश देणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आम्ही निषेध करत आहोत, असेही श्री. रमेश शिंदे यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!