24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सुकळवाड मधील नाभिक बांधवांचा अनोखा सेवा आदर्श.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सुकळवाड येथील नाभिक बांधवांनी जनसेवेचा एक अनोखा आदर्श ठेवला आहे. २०१५ सालापासून सुकळवाड येथील नाभिक समाजाचे बांधव, कुडाळ तालुक्यातील अणाव इथल्या ‘आनंदाश्रय आश्रम’ येथील वृद्धांचे केस कापणे व दाढी करणे हे केशकर्तनाचे अत्यावश्यक काम दर महिन्याला तिथे जाऊन करतात ते सुद्धा संपूर्ण मोफत..!

तळगांव, कट्टा व सुकळवाड विभागातील नाभिक बांधव या सेवेत सहभागी असतात. अनाथ, निराधार व रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून ते हे कार्य करत आहेत. या सेवेतून लाभणार्या आशीर्वादामुळेच या बांधवांच्या पदरात सुख आणि समाधान आहे अशी त्यांची धारणा आहे.

या महिन्यात संदीप सुभाष चव्हाण, दीपक लाड, गणेश कदम, संतोष कदम, सुभाष चव्हाण, किशोर लाड, रवींद्र उर्फ पप्पू चव्हाण व नाभिक बांधवांनी ‘आनंदाश्रय आश्रम’ इथे जनसेवा केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सुकळवाड येथील नाभिक बांधवांनी जनसेवेचा एक अनोखा आदर्श ठेवला आहे. २०१५ सालापासून सुकळवाड येथील नाभिक समाजाचे बांधव, कुडाळ तालुक्यातील अणाव इथल्या 'आनंदाश्रय आश्रम' येथील वृद्धांचे केस कापणे व दाढी करणे हे केशकर्तनाचे अत्यावश्यक काम दर महिन्याला तिथे जाऊन करतात ते सुद्धा संपूर्ण मोफत..!

तळगांव, कट्टा व सुकळवाड विभागातील नाभिक बांधव या सेवेत सहभागी असतात. अनाथ, निराधार व रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून ते हे कार्य करत आहेत. या सेवेतून लाभणार्या आशीर्वादामुळेच या बांधवांच्या पदरात सुख आणि समाधान आहे अशी त्यांची धारणा आहे.

या महिन्यात संदीप सुभाष चव्हाण, दीपक लाड, गणेश कदम, संतोष कदम, सुभाष चव्हाण, किशोर लाड, रवींद्र उर्फ पप्पू चव्हाण व नाभिक बांधवांनी 'आनंदाश्रय आश्रम' इथे जनसेवा केली आहे.

error: Content is protected !!