घावनळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे तर मांडकुलीत फळ झाडांचे वितरण.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घावनळेच्या वतीने घावनळे ग्रामपंचायत येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी गावातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच माजी उपसरपंच दिनेश वारंग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शासकीय सेवेतून निवृत्त झालेले घावनळे गावातील कर्मचारी, गावातून बदली झालेले कर्मचारी व शासकीय सेवेत नियुक्त झालेले गावातील विद्यार्थी यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शिवसेना मांडकुलीच्या वतीने देखील जि प. शाळा मांडकुली क्र. १ येथे गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.त्याचबरोबर गावच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (सिंधुदुर्ग) अध्यक्ष गंगाराम सडवेलकर यांच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांना फळ झाडांचे वाटप करण्यात आले. या दोन्ही गावातील उपक्रमांचे आ. वैभव नाईक यांनी कौतुक केले.
याप्रसंगी घावनळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, घावनळे सरपंच आरती वारंग, माजी उपसरपंच दिनेश वारंग, उपसरपंच योगेश घाडी, विभागप्रमुख रामा धुरी, विभाग संघटक प्रभाकर वारंग, ग्रामविकास अधिकारी भूषण चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव, ग्रामपंचायत सदस्य प्रणिल नार्वेकर, प्रभाकर जाधव, श्रद्धा तावडे, रिया नागवेकर, स्वरा धुरी, उत्तरा पिळणकर, दीपिका घाडी, मुबंई मंडळ अध्यक्ष नामदेव घाडिगांवकर, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक, शाखा प्रमुख संतोष नागवेकर, दीपक सावंत आदी पदाधिकारी आजी माजी सदस्य,कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
मांडकुली येथे पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, मांडकुली सरपंच गौतमी कासकर, उपसरपंच तुषार सामंत,उपविभाग प्रमुख दिलीप नीचम, शाखा प्रमुख निलेश खानोलकर, निलेश सामंत, ग्रा.प.सदस्य स्वप्नाली पेडणेकर, दीपाली चव्हाण, आनंद कासकर, नम्रता कासले, युवासेना प्रमुख सिद्धेश धुरी,तातू मुळीक, पोलीस पाटील अमित मराठे, रिया परब,संजना नेमळेकर, श्रेया नेमळेकर, विलास परब, दीपक खरुडे, रेशम गांवकर, शुभांगी गावडे, विनोद काळसेकर, दीपिका गावकर, विनया परब, दीपक मुळीक आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.