24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

नाभिक समाजाच्या उपक्रमांना पूर्ण पाठिंबा : माजी नगराध्यक्ष समिर नलावडे.

- Advertisement -
- Advertisement -

संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘विठ्ठल भक्त सेना’ या दशावतारी नाट्य प्रयोगाचे उत्साहात उद्घाटन ; कणकवली नाभिक संघटनेचे आयोजन.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘विठ्ठल भक्त सेना’ या दशावतारी नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी समिर नलावडे यांनी उपस्थित सर्वांना संबोधीत करताना, नाभिक समाजाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. नाभिक समाजाने जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून, समाजामध्ये पारंपारीक लोककला रुजवण्या बरोबर कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. नाभिकाचा जन्म अर्थात विठ्ठल भक्त सेना या नाट्य प्रयोगाद्वारे समाज प्रभोधन करण्याचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्गार कणकवली माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी कणकवली येथे काल १४ ऑगस्टला काढले. यावेळी गोवाराज्याचे सचिव लाडु सुर्लकर, सौ. प्रतिभा चव्हाण व विजय चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी, कणकवली नाभिक संघटनेने मेहनत घेतली. यावेळी कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने कलाकारांना प्रशस्तीपत्रक,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक समाजाचे गोवा राज्य पोलिस निरिक्षक श्री तोरोसकर, सचिव लाडु सुर्लकर, महाराष्ट्र राज्य संघटक विजय चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, कणकवली तालुकाध्यक्ष रोषण चव्हाण, प्रविण कुबल, कणकवली महिला तालुकाध्यक्षा सौ. तेजस्विनी कुबल, कणकवली युवा तालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण, समाजाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव भगिनी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित 'विठ्ठल भक्त सेना' या दशावतारी नाट्य प्रयोगाचे उत्साहात उद्घाटन ; कणकवली नाभिक संघटनेचे आयोजन.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित 'विठ्ठल भक्त सेना' या दशावतारी नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी समिर नलावडे यांनी उपस्थित सर्वांना संबोधीत करताना, नाभिक समाजाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. नाभिक समाजाने जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून, समाजामध्ये पारंपारीक लोककला रुजवण्या बरोबर कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. नाभिकाचा जन्म अर्थात विठ्ठल भक्त सेना या नाट्य प्रयोगाद्वारे समाज प्रभोधन करण्याचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्गार कणकवली माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी कणकवली येथे काल १४ ऑगस्टला काढले. यावेळी गोवाराज्याचे सचिव लाडु सुर्लकर, सौ. प्रतिभा चव्हाण व विजय चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी, कणकवली नाभिक संघटनेने मेहनत घेतली. यावेळी कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने कलाकारांना प्रशस्तीपत्रक,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक समाजाचे गोवा राज्य पोलिस निरिक्षक श्री तोरोसकर, सचिव लाडु सुर्लकर, महाराष्ट्र राज्य संघटक विजय चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, कणकवली तालुकाध्यक्ष रोषण चव्हाण, प्रविण कुबल, कणकवली महिला तालुकाध्यक्षा सौ. तेजस्विनी कुबल, कणकवली युवा तालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण, समाजाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव भगिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!