30.1 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

असला थिल्लरपणा केला तर हात पाय तोडू ; मनसेच्या अमेय खोपकरांचा इशारा.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई हल्ल्यात ज्यांच्या घरचे जवान शहीद झाले त्यांच्या घरच्यांनी टीव्ही चालू केल्यावर पाकड्यांचे मनोरंजन बघायचे का असा ठणकावून केला सवाल…!

मुंबई | ब्युरो न्यूज : सिनेमा निर्माते अमित जानी यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरसोबत चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. त्यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या मुद्द्यावर मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तसे न करण्याचा निर्मात्यांना थेट इशारा दिला आहे.

सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम कहानीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करत या चित्रपटाचे नाव ‘कराची टू नोएडा’ असे असणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी मनोरंजन आम्ही महाराष्ट्रात आणि भारतात सहन करणार नाही व आमची आधीपासून हीच भूमिका आहे असे मनसे नेते अमेय खोपकर यांनी ठणकावून सांगितले आहे.
अमित जानी उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडवरही चित्रपट बनवत असून या चित्रपटात सीमा हैदरला ‘राॅ’ एजेंटच्या भूमिकेची ऑफर करण्यात आली आहे अशा आशयाच्या चर्चा बाॅलीवुड मध्ये सुरू आहेत. याशिवाय भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या सुद्धा कहाणीवर अमित जानी चित्रपट बनवणार असून या चित्रपटाचे नाव ‘मेरा अब्दुल ऐसा नहीं है’ असं ठेवण्यात आलं असल्याच्या बातम्या येत आहेत.

सचिन मीणा व सीमा हैदर.

पुढे अमेय खोपकर म्हणाले की, ‘२०१६ साली आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्ही ४८ तासांची मुदत दिली होती त्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकारांनी इथे काम केले नव्हते. कुठलाही पाकिस्तानी कलाकार चालणार नाही अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे खोपकर यांनी म्हटले आहे. आपल्या देशावर हल्ले झाले. मागच्या आठवड्यात पुण्यातही काही अतिरेकी पकडण्यात आले आणि असे असताना आपण या पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन देतोय अशी टीका अमेय खोपकरांनी केली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली हा थिल्लरपणा चालणार नाही असेही खोपकर म्हणाले.

अमेय खोपकरांनी बॉलिवूडकरांना थेट इशारा देत म्हटले, ‘ मुंबई हल्ल्यात ज्यांच्या घरचे जवान शहीद झाले त्यांच्या घरच्यांनी टीव्ही चालू केल्यावर या पाकड्यांचं मनोरंजन बघायचे का? मी ठाम इशारा देतो, या बॉलीवूडवाल्यांनी कोणत्याही प्रकारच्या पाकड्यांना घेऊन जर काम केलं तर तुमचे हात पाय तोडूच शिवाय तुमचं काम देखील बंद करु. आमच्या जवानांचा आणि आमच्या देशाचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. “सीमा हैदर हिला घेऊन कोणीतरी बॉलीवूड निर्माता चित्रपट तयार करत आहे. तुम्ही चित्रपट तयार करा पण हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन दिला जाणार नाही” असेही खोपकर यांनी सांगितले.
मनसेच्या ठणकावून सांगितलेल्या इशार्या नंतर निर्माता अमित जानी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा कुठल्याही प्रकल्पाविषयी बोलायला नकार दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे तर सीमा हैदरने सांगितले की आपण भारतीय सिनेमात तेंव्हाच काम करू जेंव्हा भारत सरकार आपल्याला संपूर्ण क्लीन चीट देईल.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई हल्ल्यात ज्यांच्या घरचे जवान शहीद झाले त्यांच्या घरच्यांनी टीव्ही चालू केल्यावर पाकड्यांचे मनोरंजन बघायचे का असा ठणकावून केला सवाल…!

मुंबई | ब्युरो न्यूज : सिनेमा निर्माते अमित जानी यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरसोबत चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. त्यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या मुद्द्यावर मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तसे न करण्याचा निर्मात्यांना थेट इशारा दिला आहे.

सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम कहानीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करत या चित्रपटाचे नाव 'कराची टू नोएडा' असे असणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी मनोरंजन आम्ही महाराष्ट्रात आणि भारतात सहन करणार नाही व आमची आधीपासून हीच भूमिका आहे असे मनसे नेते अमेय खोपकर यांनी ठणकावून सांगितले आहे.
अमित जानी उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडवरही चित्रपट बनवत असून या चित्रपटात सीमा हैदरला 'राॅ' एजेंटच्या भूमिकेची ऑफर करण्यात आली आहे अशा आशयाच्या चर्चा बाॅलीवुड मध्ये सुरू आहेत. याशिवाय भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या सुद्धा कहाणीवर अमित जानी चित्रपट बनवणार असून या चित्रपटाचे नाव 'मेरा अब्दुल ऐसा नहीं है' असं ठेवण्यात आलं असल्याच्या बातम्या येत आहेत.

सचिन मीणा व सीमा हैदर.

पुढे अमेय खोपकर म्हणाले की, '२०१६ साली आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्ही ४८ तासांची मुदत दिली होती त्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकारांनी इथे काम केले नव्हते. कुठलाही पाकिस्तानी कलाकार चालणार नाही अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे खोपकर यांनी म्हटले आहे. आपल्या देशावर हल्ले झाले. मागच्या आठवड्यात पुण्यातही काही अतिरेकी पकडण्यात आले आणि असे असताना आपण या पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन देतोय अशी टीका अमेय खोपकरांनी केली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली हा थिल्लरपणा चालणार नाही असेही खोपकर म्हणाले.

अमेय खोपकरांनी बॉलिवूडकरांना थेट इशारा देत म्हटले, ' मुंबई हल्ल्यात ज्यांच्या घरचे जवान शहीद झाले त्यांच्या घरच्यांनी टीव्ही चालू केल्यावर या पाकड्यांचं मनोरंजन बघायचे का? मी ठाम इशारा देतो, या बॉलीवूडवाल्यांनी कोणत्याही प्रकारच्या पाकड्यांना घेऊन जर काम केलं तर तुमचे हात पाय तोडूच शिवाय तुमचं काम देखील बंद करु. आमच्या जवानांचा आणि आमच्या देशाचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. "सीमा हैदर हिला घेऊन कोणीतरी बॉलीवूड निर्माता चित्रपट तयार करत आहे. तुम्ही चित्रपट तयार करा पण हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन दिला जाणार नाही" असेही खोपकर यांनी सांगितले.
मनसेच्या ठणकावून सांगितलेल्या इशार्या नंतर निर्माता अमित जानी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा कुठल्याही प्रकल्पाविषयी बोलायला नकार दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे तर सीमा हैदरने सांगितले की आपण भारतीय सिनेमात तेंव्हाच काम करू जेंव्हा भारत सरकार आपल्याला संपूर्ण क्लीन चीट देईल.

error: Content is protected !!