मालवण | वैभव माणगांवकर : मानवी शरिरातील सर्वात कार्यरत आणि अत्यावश्यक असा अवयव म्हणजे हात….किंवा खासकरुन हाताचा तळवा तथा पंजा. निर्मिती ते पोषण अशा उपयोगाच्या हाताची काळजी घेण्यासाठीची जागृती म्हणून काल शाळाशाळांत हस्तस्वच्छता तथा हात धुणे दिन साजरा केला गेला. मालवणच्या जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलमध्येही हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन यांद्वारे दाखविला गेला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.निशाकांत पराडकर. सौ वेंगुर्लेकर मॅडम. सौ सीजा टीचर. सौ सावंत टीचर. सौ करमरकर टीचर उपस्थित होते . तसेच इयत्ता आठवी नववी दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक हस्तस्वच्छता दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा तसेच चित्रकलेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या उपक्रमाच्या निमित्ताने हात धुण्याचे महत्त्व मुलांना समजावून देण्यात आले.हात का धुवावेत याची कारणे प्रात्यक्षिकातून सुद्धा सांगण्यात आली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -