कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने ५६ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या प्राथमीक फेरीत दमदार यश संपादन करुन १६ पैकी १० इव्हेंटमध्ये विद्यापीठ फेरीसाठी पात्रता सिद्ध केली आहे.
वैभववाडी येथील ‘आनंदीबाई रावराणे वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालय’ येथे १० ऑगस्टला संपन्न झालेल्या प्राथमीक फेरीत व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सर्वंकष दबदबा राहीला. सिंधुदुर्ग विभागातून एकूण ३८ महाविद्यालये या महोत्सवाच्या प्राथमीक फेरीत सहभागी झाली होती. या महोत्सवाचे काही इव्हेंट हे थेट मुंबई विद्यापीठ भवन येथेच होणार आहेत.

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज ने ‘स्पाॅट फोटोग्राफी व शाॅर्ट फिल्म’ या प्रकारातही त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. आता विद्यापीठ फेरीचे सर्व इव्हेंट हे २९ ऑगस्टपासून मुंबई विद्यापीठ भवन येथे सुरु होणार आहेत.प्राथमीक विभागीय फेरीत यशस्वी झालेले सहभागी व त्यांचे इव्हेंट खालील प्रमाणे आहेत.

१. वादविवाद इंग्रजी (प्रथम क्रमांक)a. सहिष्णू पंडित ( B.L.S. L.L.B 4th year), b. विलासिनी बापर्डेकर (L.L.B. 3rd year).
२. वादविवाद मराठी ( द्वितीय क्रमांक ) a. अर्जुन गावडे(L.L.B. 3rd year), b. अथर्व कुंटे (L.L.B. 3rd year).
३. वक्तृत्व मराठी (द्वितीय क्रमांक), चैतन्या सावंत(L.L.B. 3rd year).
४. वक्तृत्व इंग्रजी (उत्तेजनार्थ)दिपीका राठोड (L.L.B. 3rd year).
५. मराठी एकांकिका (द्वितीय क्रमांक)a. प्राची चिंदरकर (L.L.B. 3rd year), b. पूजा पटेल(L.L.B. 3rd year), c. मेधा परब(L.L.B. 3rd year).
६. कथाकथन मराठी (प्रथम क्रमांक) प्रथमेश सामंत (L.L.B. 3rd year).
७. कथाकथन हिंदी (तृतीय क्रमांक) आसावरी गोगटे (L.L.B. 3rd year).
८. एक पात्री अभिनय (तृतीय क्रमांक) प्रथमेश सामंत (L.L.B. 3rd year).
९. कोलाज (उत्तेजनार्थ)अमेय जोशी ( B.L.S.L.L.B 3rd year ).

या प्राथमीक फेरीच्या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे, सहसमन्वयक डाॅ. नितीन वळंजू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन प्राचार्य व प्राध्यापक व युवा महोत्सवाचे समन्वयक तसेच स्वयंसेवक उपस्थित होते. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज मधील शैक्षणिक विकासासोबतच त्यांची होणारी सांस्कृतिक प्रगती ही प्रत्येक वर्षी एक नवीन टप्पा पार करत यश मिळवत आहे या बद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी व संचालक यांची प्रशंसा होत आहे.