26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये पालक दिन उत्साहात साजरा

- Advertisement -
- Advertisement -

मालवण/ प्रतिनिधी नझिरा शेख : दि २८ जुलै २०२३ रोजी पालक दिनाचे औचित्य साधून रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी पालकांच्या सन्मानासाठी व मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर. ऑल्विन गोन्सालवीस, फादर फ्रँकलीन व सन्माननीय अतिथी पालक म्हणून श्री. चंद्रशेखर वाईरकर व सौ. शितल वाईरकर उपस्थित होत्या. शाळेतील मुलांनी आपल्या पालकांना शुभेच्छा पत्र व गुलाबाचे फूल देऊन सन्मानित केले. स्वागतगीत, बालकलाकारांचे फॅन्सी ड्रेस , महाराष्ट्रीयन व दक्षिणात्य नृत्य , कौटुंबिक नाटीका व मनोरंजनात्मक जुन्या गाण्यांवरील नृत्याद्वारे सर्वांची मने सुखावून गेली . कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्तीधारक विद्यार्थांनाही सन्मानित करण्यात आले.श्री . चंद्रशेखर वाईरकर यांनी आपल्या भाषणात शाळेचे भरभरुन कौतुक तर केलेच पण त्याचबरोबर पालकांनी मुलांना सर्व सुखसोयी देत असताना त्यांना त्यांच्या आयुष्यात संघर्षही करू द्यावा म्हणजे मग आयुष्यात त्यांना कोणत्याही अडचणीना सामोरे जाताना, आपली हार पचवताना कोणताही त्रास होणार नाही असे प्रतिपादन केले. तसेच मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्सालवीस यांनीही मुलांना व पालकांना सुजाण पालकत्वाचा उत्तम संदेश दिला. पालक आपल्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण घेऊन येतात, त्यांचा मान राखणे व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे व ते कर्तव्य मनापासून पार पाडले गेले पाहिजे असे मुख्याध्यापक म्हणाले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अमूल्य सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेची विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. श्रेया राठोड व विद्यार्थी प्रतिनिधी कु. निल मांजरेकर यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण/ प्रतिनिधी नझिरा शेख : दि २८ जुलै २०२३ रोजी पालक दिनाचे औचित्य साधून रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी पालकांच्या सन्मानासाठी व मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर. ऑल्विन गोन्सालवीस, फादर फ्रँकलीन व सन्माननीय अतिथी पालक म्हणून श्री. चंद्रशेखर वाईरकर व सौ. शितल वाईरकर उपस्थित होत्या. शाळेतील मुलांनी आपल्या पालकांना शुभेच्छा पत्र व गुलाबाचे फूल देऊन सन्मानित केले. स्वागतगीत, बालकलाकारांचे फॅन्सी ड्रेस , महाराष्ट्रीयन व दक्षिणात्य नृत्य , कौटुंबिक नाटीका व मनोरंजनात्मक जुन्या गाण्यांवरील नृत्याद्वारे सर्वांची मने सुखावून गेली . कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्तीधारक विद्यार्थांनाही सन्मानित करण्यात आले.श्री . चंद्रशेखर वाईरकर यांनी आपल्या भाषणात शाळेचे भरभरुन कौतुक तर केलेच पण त्याचबरोबर पालकांनी मुलांना सर्व सुखसोयी देत असताना त्यांना त्यांच्या आयुष्यात संघर्षही करू द्यावा म्हणजे मग आयुष्यात त्यांना कोणत्याही अडचणीना सामोरे जाताना, आपली हार पचवताना कोणताही त्रास होणार नाही असे प्रतिपादन केले. तसेच मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्सालवीस यांनीही मुलांना व पालकांना सुजाण पालकत्वाचा उत्तम संदेश दिला. पालक आपल्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण घेऊन येतात, त्यांचा मान राखणे व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे व ते कर्तव्य मनापासून पार पाडले गेले पाहिजे असे मुख्याध्यापक म्हणाले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अमूल्य सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेची विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. श्रेया राठोड व विद्यार्थी प्रतिनिधी कु. निल मांजरेकर यांनी मानले.

error: Content is protected !!