मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ. प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर’ मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवासा समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न झाले.
या शिबिरात डॉ. प्रफुल्ल विजयकर व टीमच्या वतीने मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर, मुकबधीर, शारिरीक व्यंग, मानसिक अधू इत्यादी विकारांवर २० वर्षाखालील मुला मुलींची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. सुमारे १५६ रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे तज्ञ संस्थापक डॉ.अंबरीश विजयकर, डॉ.प्रदीप विजयकर, डॉ.तन्मय विजयकर, डॉ.अपर्णा सामळ, डॉ.श्वेताली विजयकर, डॉ.क्षितिज जोशी, रजत मालोकर, अभिषेक आदीसह मंदिर समितीच्या सेवेकर्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवशरण अचलेर, प्रथमेश इंगळे, चंद्रकांत सोनटक्के, सुनील पवार, श्रीशैल गवंडी, अमर पाटील, रवी मलवे, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.