25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आ. नितेश राणे यांच्या पहाणी नंतर गगनबावडा-तरेळे मार्गावर पावसाळी डांबराने खड्डे भरायचे काम तत्काळ सुरु.

- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची त्वरीत काम पूर्ण करायची कबुली.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी- देवगड- कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या पहाणीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तरळे – गगनबावडा मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळी डांबरानेच खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हे काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहन चालकांत समाधान व्यक्त होत आहे.

तरेळे – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली होती. नाधवडे, कोकिसरे करूळ गावानजीक मार्गावरुन चालणे ही अवघड झाले होते. तर करूळ घाट अक्षरशः खड्ड्यात गेला होता अशा पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार नितेश राणे यांनी या रस्त्याची व घाटाची पाहणी केली. महामार्गाचे अधिकारी अतुल शिवनिवार यांना त्यांनी धारेवर धरत खडे बोल सुनावले होते. आमदार नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराने त्वरीत भरले जातील व गटार सफाईची कामे केली जातील असे कबूल केले होते.

सोमवार पासून नाधवडे येथील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. तर कोकिसरे, करुळ व करूळ घाटातील ही खड्डे भरण्यात येणार आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महामार्गासाठी जवळपास २५० कोटी मंजूर झाले आहेत. हे काम देखील काही महिन्यात सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी खड्डे भरण्यात येत असल्याने गावातील ग्रामस्थ, वाहन चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची त्वरीत काम पूर्ण करायची कबुली.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी- देवगड- कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या पहाणीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तरळे - गगनबावडा मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळी डांबरानेच खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हे काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहन चालकांत समाधान व्यक्त होत आहे.

तरेळे - गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली होती. नाधवडे, कोकिसरे करूळ गावानजीक मार्गावरुन चालणे ही अवघड झाले होते. तर करूळ घाट अक्षरशः खड्ड्यात गेला होता अशा पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार नितेश राणे यांनी या रस्त्याची व घाटाची पाहणी केली. महामार्गाचे अधिकारी अतुल शिवनिवार यांना त्यांनी धारेवर धरत खडे बोल सुनावले होते. आमदार नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराने त्वरीत भरले जातील व गटार सफाईची कामे केली जातील असे कबूल केले होते.

सोमवार पासून नाधवडे येथील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. तर कोकिसरे, करुळ व करूळ घाटातील ही खड्डे भरण्यात येणार आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महामार्गासाठी जवळपास २५० कोटी मंजूर झाले आहेत. हे काम देखील काही महिन्यात सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी खड्डे भरण्यात येत असल्याने गावातील ग्रामस्थ, वाहन चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!