27 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

वायरमन बांधवांनी वीजपुरवठा केला सुरळीत ; ठाकरे गट शिवसेना ग्रा पं सदस्य वंदेश ढोलम व युवासैनिक यांचा पुढाकार.

- Advertisement -
- Advertisement -

कट्टा येथे वीज व पाण्याची गंभीर समस्या टळली.

मालवण | सुयोग पंडित : मालवण तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक व युवासैनिकांनी प्रसंगावधान राखत आज भर पावसाच्या स्थितीत कट्टा येथील ग्रामस्थांच्या मोठ्या समस्येचे निवारण केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या नांदोस येथे विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने कट्टा गोकुळआळी परिसरात व बाजारपेठेतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे त्या वाहिनीवरून कट्टा गोकुळआळी व बाजारपेठ परिसरात आज पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता आणि उद्या पण झाला नसता तर पाण्याची समस्या निर्माण झाली असती व याचा ग्रामस्थांना मनःस्ताप सहन करावा लागला असता. त्यानंतर वायरमन बांधवांशी संपर्क केल्यावर त्यांनी समस्या सांगितली व मदत करण्याचे आवाहन केले. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य वंदेश ढोलम , समीर माळवदे म, निखिल बांदेकर, किरण वाईरकर, उपेंद्र बोडये, सिद्धार्थ हिरवे, दर्शन म्हाडगुत यांनी जागी जाऊन फांदी बाजूला करण्यास मदत केली. या कार्यवाहीत वायरमन गणेश वारंग, मोहाळे व वायंगणकर यांनी युद्धपातळीवर रात्री ८ वाजेपर्यंत अतिशय खडतर भाग व परिस्थितीत काळोखात काम केले. या बद्दल सर्वांचे आभार मानले जात आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कट्टा येथे वीज व पाण्याची गंभीर समस्या टळली.

मालवण | सुयोग पंडित : मालवण तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक व युवासैनिकांनी प्रसंगावधान राखत आज भर पावसाच्या स्थितीत कट्टा येथील ग्रामस्थांच्या मोठ्या समस्येचे निवारण केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या नांदोस येथे विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने कट्टा गोकुळआळी परिसरात व बाजारपेठेतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे त्या वाहिनीवरून कट्टा गोकुळआळी व बाजारपेठ परिसरात आज पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता आणि उद्या पण झाला नसता तर पाण्याची समस्या निर्माण झाली असती व याचा ग्रामस्थांना मनःस्ताप सहन करावा लागला असता. त्यानंतर वायरमन बांधवांशी संपर्क केल्यावर त्यांनी समस्या सांगितली व मदत करण्याचे आवाहन केले. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य वंदेश ढोलम , समीर माळवदे म, निखिल बांदेकर, किरण वाईरकर, उपेंद्र बोडये, सिद्धार्थ हिरवे, दर्शन म्हाडगुत यांनी जागी जाऊन फांदी बाजूला करण्यास मदत केली. या कार्यवाहीत वायरमन गणेश वारंग, मोहाळे व वायंगणकर यांनी युद्धपातळीवर रात्री ८ वाजेपर्यंत अतिशय खडतर भाग व परिस्थितीत काळोखात काम केले. या बद्दल सर्वांचे आभार मानले जात आहेत.

error: Content is protected !!