28.2 C
Mālvan
Sunday, April 6, 2025
IMG-20240531-WA0007

जिल्ह्यातील कलाकारांसाठी भरीव प्रयत्न करणार ; सिने-टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती नंतर सौ. संजना हळदिवे यांचे प्रतिपादन. ( सिनेपट विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

सौ. संजना हळदिवे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून होत आहे प्रशंसा..!

सिनेपट | मालवण प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. संजना संजय हळदीवे यांची सिने- टेली कलाकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सिने- टेली कलाकार
सेवा संघाचे पूर्व मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनिल गोडबोले, किशोर पाटील, अनामिका सावंत, सचिव डॉ. वैष्णवी बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.

सिने टेली कलाकार संघ देशातील ६ राज्यांत कलाकारांसाठी कार्यरत आहे. सौ. संजना हळदिवे यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

सिने-टेली ही संस्था राज्यातील मराठी चित्रपट सृष्टी व नाट्यसृष्टी यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम तसेच लेखन, दिग्दर्शन, अभिनय अभ्यासक्रम चालविण्यासाठी सरकार प्रमाणेच आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ प्रमाणित असतील, अशाच कोर्सेससाठी तसेच मराठी निर्मात्यांना माफक दरात मोबदला घेवून चित्रिकरणाला जागा उपलब्ध करून देण्याचा आणि सभासदांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार वगैरेंना संघटनेच्या माध्यमातून काम, न्याय व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी भरीव प्रयत्न व काम करणार असल्याचे आश्वासक प्रतिपादन नूतन अध्यक्ष सौ. संजना हळदिवे यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सौ. संजना हळदिवे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून होत आहे प्रशंसा..!

सिनेपट | मालवण प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. संजना संजय हळदीवे यांची सिने- टेली कलाकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सिने- टेली कलाकार
सेवा संघाचे पूर्व मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनिल गोडबोले, किशोर पाटील, अनामिका सावंत, सचिव डॉ. वैष्णवी बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.

सिने टेली कलाकार संघ देशातील ६ राज्यांत कलाकारांसाठी कार्यरत आहे. सौ. संजना हळदिवे यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

सिने-टेली ही संस्था राज्यातील मराठी चित्रपट सृष्टी व नाट्यसृष्टी यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम तसेच लेखन, दिग्दर्शन, अभिनय अभ्यासक्रम चालविण्यासाठी सरकार प्रमाणेच आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ प्रमाणित असतील, अशाच कोर्सेससाठी तसेच मराठी निर्मात्यांना माफक दरात मोबदला घेवून चित्रिकरणाला जागा उपलब्ध करून देण्याचा आणि सभासदांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार वगैरेंना संघटनेच्या माध्यमातून काम, न्याय व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी भरीव प्रयत्न व काम करणार असल्याचे आश्वासक प्रतिपादन नूतन अध्यक्ष सौ. संजना हळदिवे यांनी केले.

error: Content is protected !!