25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सप्तशृंगी घाटात एस टी बसचा भीषण अपघात ; १ जण जागीच मृत्युमुखी.

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज | नाशिक : नाशिकच्या सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एस.टी. बसचा भीषण अपघात झाला आहे. देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची ही बस थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १ व्यक्ती मृत पावली असून २५ प्रवासी जबर जखमी झाले आहेत. आज बुधवारी सकाळी पावणे सातच्या दरम्यान वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन करून भाविक येत असताना बस दरीत कोसळली. घाटातील एका अवघड वळणावर गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्यानंतर १ प्रवाशी जागीच ठार झाला तर अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची घटना समजताच तिथल्या स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. ही बस खामगांव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी या अपघाताची प्राथमीक माहिती देताना सांगितले की या ठिकाणी एक अवघड यू-टर्न आहे. तिथून वळण घेत असताना बस चालकाला बस कंट्रोलमध्ये ठेवता आली नसावी, त्यामुळे हा अपघात झाला असेल. पण त्या विषयी घाईत सांगणे योग्य होणार नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशीही माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

फोटो सौजन्य : नाशिक ब्युरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्युरो न्यूज | नाशिक : नाशिकच्या सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एस.टी. बसचा भीषण अपघात झाला आहे. देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची ही बस थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १ व्यक्ती मृत पावली असून २५ प्रवासी जबर जखमी झाले आहेत. आज बुधवारी सकाळी पावणे सातच्या दरम्यान वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन करून भाविक येत असताना बस दरीत कोसळली. घाटातील एका अवघड वळणावर गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्यानंतर १ प्रवाशी जागीच ठार झाला तर अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची घटना समजताच तिथल्या स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. ही बस खामगांव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी या अपघाताची प्राथमीक माहिती देताना सांगितले की या ठिकाणी एक अवघड यू-टर्न आहे. तिथून वळण घेत असताना बस चालकाला बस कंट्रोलमध्ये ठेवता आली नसावी, त्यामुळे हा अपघात झाला असेल. पण त्या विषयी घाईत सांगणे योग्य होणार नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशीही माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

फोटो सौजन्य : नाशिक ब्युरो

error: Content is protected !!