ओरोस | प्रतिनिधी : जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज इतिहास विषयाची तयारी व अभ्यास करताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग कसा काढावा यावर ऑनलाईन मार्गदर्शन आज बुधवार दि. 13 ऑक्टोंबर 2021 रोजी सायं. 5 ते 6 या वेळेत मार्गदर्शनाचे चौथे सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन सत्र फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 ऑनलाईन होत आहे.
आज होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, नगर पंचायत वैभववाडीचे मुख्य अधिकारी, सुरज कांबळे व नगर पंचायत, दोडामार्गचे मुख्य अधिकारी, शिवराज गायकवाड हे अधिकारी सहभागी होणार आहेत.
तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे.
यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा.
- Advertisement -
- Advertisement -