सामाजिक क्षेत्रातील विविध पदांवर सक्रीय असलेल्या ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची सर्व स्तरांतून प्रशंसा.
मालवण | सुयोग पंडित : शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्या व व्यापार , कृषी व उद्योग क्षेत्रात राज्याचा पाया रचणार्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स , इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर’ संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ तथा गवर्नींग काऊन्सीलवर वेंगुर्ले येथील ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर संस्थेने ‘व्हिजन २०२७’ असा एक रोड मॅप आखला असून त्या पार्श्वभूमीवर ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची ही निवड अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
ॲड. नंदन वेंगुर्लेकर सध्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक, अर्थकारण, उद्योग, न्याय, व्यापार,पर्यावरणाशी निगडीत अशा विविध पदांच्या जबाबदार्या भूषवत असून ती पदे
‘आधार फाऊंडेशन सिंधुदुर्ग (सचिव ), कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग ( उपाध्यक्ष), महाराष्ट्र राज्य जिमनॅस्टिक असोसिएशन (राज्य उपाध्यक्ष) महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ( संचालक), सिंधुदुर्ग जिल्हा चेस असोसिएशन ( सदस्य), सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशन( सचिव), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ( सिंधुदुर्ग शाखा व्यवस्थापक), CRZ जिल्हास्तरीय समन्वय समिती ( कोकण विभाग समन्वयक), सिंधुदूर्ग जिल्हा भंडारी सहकारी पतसंस्था मर्यादित, वेंगुर्ला ( माजी चेअरमन व विद्यमान संचालक), कोस्टल बेल्ट डेव्हलपमेंट संस्था, सिंधुदुर्ग ( संस्थापक व सदस्य), कोकण स्टुडंट युथ फेडरेशन,कोल्हापूर( NGO), संस्थापक व सदस्य), तसेच संस्थापक व सदस्य, वेंगुर्ला तालुका स्पोर्टस वेलफेअर असो, वेंगुर्ला, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बीपीएड बेरोजगार संघटना, सिंधुदूर्ग अध्यक्ष, वेंगुर्ला तालुका क्रिडा समन्वय समिती, वेंगुर्ला, सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा खो खो असोसिएशन, सिंधुदुर्ग, सहसचिव, नगरवाचनालय, वेंगुर्ला,माजी सदस्य, तालुका क्रीडा संकुल समिती, वेंगुर्ला, सदस्य, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन, महाराष्ट्र, माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग, सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन, सिंधुदुर्ग
सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन, सिंधुदुर्ग’, इतकी विविध स्तरीय आहेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर या संस्थेच्या स्विकृत सदस्यपदी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातून प्रशंसा होत आहे.