मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्यातील क्रिकेट पंचांचे ज्ञान वृद्धिंगत करुन पंचगिरीचे व पर्यायाने पंचांचेही प्रगल्भ सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) महाराष्ट्र राज्यातील २० जिल्ह्यातल्या क्रिकेट पंचांकरिता ५ केंद्रे निश्चित केली. त्यानुसार ६ जुलै ते ९ जुलै या कालावधीत पंचांसाठी विशेष मार्गदर्शक अशा कार्यशाळेचे आयोजन केले गेले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील एकूण १९० क्रिकेट पंचांनी सहभाग नोंदवला. रत्नागिरी येथे झालेल्या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंच दिनेश कुबडे, संदीप रुद्रे, दिपक धुरी, गोविंद केरकर ( बंटी केरकर ), राहुल रेगे असे अनुभवी पंच तर रामप्रसाद शिर्के, हेमेंद्र मेस्त, वल्लभ घोटगे, अमोल मेस्त्री, मनोज कुडाळकर अशा होतकरू व एकूण १० पंचांनी सहभाग नोंदवला.
सध्या पावसाळी मोसम असल्याने मैदानावरील स्पर्धात्मक क्रिकेटला जरी विश्रांती असली तरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तांत्रिक अभ्यास व पंचांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आखलेल्या या उपक्रमाबद्दल क्रीडा तज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे.