बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील व्यापारी श्री. भाऊ वळंजू यांचा राज्य वस्तू व सेवा कर विभाग ओरोस यांनी विहित मुदतीत विवरणपत्र दाखल करून सर्वाधिक वस्तू व सेवा कराचा भरणा करणारे ‘आदर्श व्यापारी’ म्हणून नुकताच सन्मान केला.

या मिळालेल्या सन्मानाबद्दल बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद ख़तीब यांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. जिल्ह्यात विहित वेळेत सर्वाधिक कर भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना गौरविण्यात येते. यामध्ये वळंजू यांचा समावेश आहे. बांदा शहरासाठी हे भूषणावह असल्याचे सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, वराडकर आदी उपस्थित होते.