25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जिल्ह्यातील वैद्यकीय चिकित्सा व उपचारांसाठी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश ; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचला परवानगी.

- Advertisement -
- Advertisement -

पूर्व मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना.

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णत्वाला नेलेल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने व नॅशनल मेडिकल कमिशनने मंजुरी दिली आहे. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांची ही बॅच असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विषयक प्रगतीच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असून आरोग्य सुविधेत हे रुग्णालय महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची समस्या सोडविण्यासाठी आणि जिल्हावासियांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि जिल्हावासियांच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली. यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात आल्या. गेली दोन वर्षे या वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी १०० जागांप्रमाणे दोन बॅचची परवानगी मिळवून २०० विद्यार्थी एमबीबीएस कोर्सचे शिक्षण घेत आहेत. आता तिसऱ्या बॅचसाठी परवानगी मिळाल्याने आणखी १०० असे एकूण ३०० डॉक्टर जिल्ह्यात घडणार आहे. हे डॉक्टर पुढच्या वर्षीपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात रुग्णांवर उपचार करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय आता हळूहळू दूर होणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पूर्व मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना.

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णत्वाला नेलेल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने व नॅशनल मेडिकल कमिशनने मंजुरी दिली आहे. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांची ही बॅच असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विषयक प्रगतीच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असून आरोग्य सुविधेत हे रुग्णालय महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची समस्या सोडविण्यासाठी आणि जिल्हावासियांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि जिल्हावासियांच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली. यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात आल्या. गेली दोन वर्षे या वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी १०० जागांप्रमाणे दोन बॅचची परवानगी मिळवून २०० विद्यार्थी एमबीबीएस कोर्सचे शिक्षण घेत आहेत. आता तिसऱ्या बॅचसाठी परवानगी मिळाल्याने आणखी १०० असे एकूण ३०० डॉक्टर जिल्ह्यात घडणार आहे. हे डॉक्टर पुढच्या वर्षीपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात रुग्णांवर उपचार करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय आता हळूहळू दूर होणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

error: Content is protected !!