24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बेळणेत आचरा हद्दीतील पोलीस पाटीलांची बैठक संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | गणेश चव्हाण : काही दिवसांपूर्वी चंदगड जि. कोल्हापूर येथील पोलीस पाटलाचा झालेल्या दुर्दैवी खून प्रकरणाच्या अनुषंगाने बेळणे चेक पोस्ट येथे, आचरा पोलिस ठाणे अंतर्गत सर्व पोलीस पाटील यांची संयुक्तीक बैठक पोलीस सहा. निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.

पोलीस पाटील हे शासन व पोलीस खात्याचा शेवटच्या टप्प्यातील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा असतात. पोलीस पाटील हे गावातील एखादी संवेदनशील माहितीची देवाण – घेवाण करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी व पोलीस ठाणे कडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात चर्चा केली. सर्व पोलीस पाटलांचे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मनोबल वाढवण्यात आले. तसेच हिवाळे गावचे पोलीस पाटील विरेंद्र कदम हे कायमस्वरूपी सतर्क राहून पोलीस ठाणेस त्वरित माहिती देत असल्याकारणाने गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न झाल्याने त्यांचा आचरा पोलीस ठाणे मार्फत विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गोठणे पोलीस पाटील महेंद्र तळवडेकर व असगणी पोलीस पाटील आनंद तांबे यांनी पोलीस पाटील म्हणून गावात काम करत असताना गावांमध्ये निर्माण होणाऱ्या अडी अडचणींबाबत अधिकारी आनिल व्हटकर यांच्या सोबत चर्चा केली. पोलीस ठाण्यातील नेमणुकीतील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून गांव भेटी दरम्यान पोलीस पाटील यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल ग्रामस्थांसमोर सत्कार करून त्यांचा मानसन्मान व मनोबल वाढवण्याबाबत प्रयत्न करण्यात येतीलमल असे आश्वासन दिले.

या वेळी आचरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील आणि पोलीस ठाणे मार्फत पोलीस अंमलदार अक्षय धेंडे व अनिकेत सावंत उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | गणेश चव्हाण : काही दिवसांपूर्वी चंदगड जि. कोल्हापूर येथील पोलीस पाटलाचा झालेल्या दुर्दैवी खून प्रकरणाच्या अनुषंगाने बेळणे चेक पोस्ट येथे, आचरा पोलिस ठाणे अंतर्गत सर्व पोलीस पाटील यांची संयुक्तीक बैठक पोलीस सहा. निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.

पोलीस पाटील हे शासन व पोलीस खात्याचा शेवटच्या टप्प्यातील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा असतात. पोलीस पाटील हे गावातील एखादी संवेदनशील माहितीची देवाण - घेवाण करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी व पोलीस ठाणे कडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात चर्चा केली. सर्व पोलीस पाटलांचे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मनोबल वाढवण्यात आले. तसेच हिवाळे गावचे पोलीस पाटील विरेंद्र कदम हे कायमस्वरूपी सतर्क राहून पोलीस ठाणेस त्वरित माहिती देत असल्याकारणाने गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न झाल्याने त्यांचा आचरा पोलीस ठाणे मार्फत विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गोठणे पोलीस पाटील महेंद्र तळवडेकर व असगणी पोलीस पाटील आनंद तांबे यांनी पोलीस पाटील म्हणून गावात काम करत असताना गावांमध्ये निर्माण होणाऱ्या अडी अडचणींबाबत अधिकारी आनिल व्हटकर यांच्या सोबत चर्चा केली. पोलीस ठाण्यातील नेमणुकीतील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून गांव भेटी दरम्यान पोलीस पाटील यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल ग्रामस्थांसमोर सत्कार करून त्यांचा मानसन्मान व मनोबल वाढवण्याबाबत प्रयत्न करण्यात येतीलमल असे आश्वासन दिले.

या वेळी आचरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील आणि पोलीस ठाणे मार्फत पोलीस अंमलदार अक्षय धेंडे व अनिकेत सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!